Jalna News : मोठी बातमी! जालन्यात तब्बल 86 जीवांचा तडफडून मृत्यू; भोकरदन तालुक्यातील घटना
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Jalna News : जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को परिसरातील मेंढपाळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
जालना, (रवी जैस्वाल, प्रतिनिधी) : आठवडाभर उसंत घेतलेल्या पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नदीनाले दुधडी भरुन वाहत आहेत. जोरदार पाऊस बरसल्याने शेतकरी, मेंढपाळही आनंदी होते. जनावरांना चारा झाल्याने माळरानावर मेंढपाळांची गर्दी दिसत होती. जालन्यात मेंढपाळावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका घटनेत तब्बल 86 मेंढ्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
दूषित पाण्यामुळं तब्बल 86 मेंढ्यांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को परिसरात घडली. मेंढपाळ बाळू शिंगाडे हे मेंढपाळ असून त्यांच्याकडे 200 मेंढ्या आहेत. ते नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत मेंढ्या चारत होते. दरम्यान यावेळी मेंढ्यांनी खोलगट स्थळी साचलेले रासायनिक खताचे विषारी पाणी पिल्याचा अंदाज असून पंधरा ते वीस मिनिटात मेंढ्या जमिनीवर कोसळल्या. यात तब्बल 86 मेंढ्याचा तडफडून मृत्यू झाला. त्यामुळं मेंढपाळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर असून या घटनेत 13 लाखांहून अधिक आर्थिक नुकसान झालं आहे. दरम्यान याची माहिती मिळताच राजूर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बाधित मेंढ्यांवर उपचार केलेत. मात्र, 86 मेंढ्या दगावल्यानं मोठं नुकसान झालं असून शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी मेंढपाळ शिंगाडे यांनी केली आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
August 27, 2024 10:25 PM IST
मराठी बातम्या/जालना/
Jalna News : मोठी बातमी! जालन्यात तब्बल 86 जीवांचा तडफडून मृत्यू; भोकरदन तालुक्यातील घटना