अस्मानी संकट आलं अन् होत्याचं नव्हतं झालं, कांदा कुजला, महिला शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी!
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Onion Farming: अवकाळी पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जालन्यातील शेतकऱ्यांचा कांदा शेतातच सडला आहे.
जालना: मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण राज्यभर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील अस्मानी संकटानं मोठं नुकसान झालं असून उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी संकटात आहे. जालना जिल्ह्यात कांदा शेतातच सडल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. याबाबत लोकल18 ने थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
जालना जिल्ह्यातील वखारी येथील मनकरणा अंकुशराव घुले या अल्पभूधारक महिला शेतकरी आहेत. आपल्या अर्धा एकर क्षेत्रावर त्यांनी तीन महिन्यांपूर्वी कांदा पिकाची लागवड केली होती. शेतामध्ये कांद्याची काढणी करून झाली होती. पाऊस आल्याने शेतामध्येच हा कांदा झाकून ठेवण्यात आला होता. परंतु 5 मे पासून दररोज पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने शेतातील कांदा हालवणं शक्य झालं नाही आणि काढलेला कांदा जाग्यावरच सडल्याचे चित्र आहे.
advertisement
काहीतरी नवीन पिक घ्यावं म्हणून कांदा पिकाची लागवड केली होती. अर्धा एकर मध्ये त्यांना 60 क्विंटलपर्यंत कांद्याचे उत्पन्न झालं. पीक चांगलं जोमात आलं, पण पावसाने सगळं हिरावून घेतलं. तबल 40 टक्के कांदा रानातच सडून गेल्याने त्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे घातलेला खर्च निघणंही मुश्किल झालंय, असं मनकरणा घुले सांगतात.
advertisement
घरची परिस्थिती बेताची
“मला पती नाहीत, नीट नेटकं घर नाही. मुलगा अपंग आहे. गरीबीचा संसार आहे. त्यात हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलं. शासनाने नुकसानीची दखल घेऊन मदत करावी,” अशी अपेक्षा मनकरणा घुले यांनी व्यक्त केली.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
May 25, 2025 7:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
अस्मानी संकट आलं अन् होत्याचं नव्हतं झालं, कांदा कुजला, महिला शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी!








