एकीकडे धो धो पाऊस, पण छ. संभाजीनगरच्या 65 गावांवर जलसंकट, पिण्यासाठीही नाही पाणी!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: मराठवाड्यात वादळी पावसाचं आस्मानी संकट घोंघावत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधील 65 गावं जलसंकटात असून विकत पाणी घ्यावं लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यात गेल्या महिनाभरापासून धो धो पाऊस होतोय. परंतु, छत्रपती संभाजीनगरमधील काही भागात पाणीबाणीची स्थिती आहे. तालुक्यातील जवळपास 65 गावांवर जलसंकट असून शेंद्रा जलकुंभ येथून 55 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र काही ठिकाणी सरकारी टँकरच उपलब्ध नसल्याने नागरिकांना विकत पाणी घ्यावं लागतंय. एका कुटुंबाला पाण्यासाठी महिन्याकाठी 5 हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत.
शहरातील पहाडसिंगपुरा येथील हनुमान टेकडी परिसरात रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा जारला 40 रुपये मोजावे लागतात. तसेच या ठिकाणी सरकारी नळ कनेक्शन देखील नाही. त्यामुळे खाजगी टँकर धारकांना देखील पैसे देऊन पाणी विकत घ्यावे लागते. येथील रहिवाशी पाण्याअभावी त्रासून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे, प्रत्येक घराला महिन्यातून दोन ते तीन पाणी टँकर लागते. एक टँकर 1700 रुपयांना मिळतो. तर दर महिन्याला सुमारे पाण्यासाठी पाच हजार रुपये खर्च करावा लागत असल्याचे हनुमान टेकडी येथील रहिवाशी सुनीता बैरागी यांनी लोकल18 सोबत बोलतांना सांगितले.
advertisement
सरकारने आमच्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बैरागी यांनी सरकारकडे केली आहे. तर मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने अडचणीचे होते. पाणी विकत घ्यावे लागते आणि सध्या देखील अशीच पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे टँकरनेच पाणी पुरवठा होत असल्याचे शेंद्रा गावातील भाऊलाल कस्तुरे यांनी सांगितले.
advertisement
महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही दिवसांपासून पाऊस पडतोय. तरीही ग्रामीण भागासह शहरातील पाणी टंचाईची समस्या कायम आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गावाच्या लोकसंख्येनुसार ज्या गावात लोकसंख्या जास्त असेल तिथे दोन पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. तर काही ठिकाणच्या गावची लोकसंख्या कमी असल्याने त्यांना 1 टँकरद्वारे पाणी पुरवठा होत असल्याचे टँकर चालक गणेश घुले यांनी सांगितले.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
May 25, 2025 10:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
एकीकडे धो धो पाऊस, पण छ. संभाजीनगरच्या 65 गावांवर जलसंकट, पिण्यासाठीही नाही पाणी!

