Water : आरओ किंवा जारचे पाणी पिताय? लगेच बदला सवय, नाहीतर गंभीर आजाराला जावे लागेल समोर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
आता सर्वत्रच आरओचे पाणी पिण्याची किंवा जार पाणी पिण्याचे पद्धत आहे. ज्यांच्या घरी आरओ असेल सर्वच लोक विकत जारचे पाणी घेऊन पितात.
छत्रपती संभाजीनगर : आता सर्वत्रच आरओचे पाणी पिण्याची किंवा जार पाणी पिण्याचे पद्धत आहे. ज्यांच्या घरी आरओ असेल सर्वच लोक विकत जारचे पाणी घेऊन पितात. पण आपण जे पाणी चांगला आहे किंवा अतिशय शुद्ध असं म्हणून पितो ते खरंच शुद्ध असतं का? हे पाणी पिल्यानंतर काय आजार आपल्याला होतात? याविषयीचं मूत्ररोग तज्ज्ञ आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. आदित्य येळीकर आपल्याला माहिती सांगितली आहे.
आरओचे पाणी पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण त्या पाण्यात टीडीएसचे प्रमाण 50 पेक्षा कमी असेल, तर तुमचे हाडे ठिसूळ होऊ शकतात. सांध्यामध्ये त्रास होऊ शकतो. एवढेच नव्हे तर अति जास्त टीडीएसचे पाणी प्यायल्यास हृदयावर परिणामही होऊ शकतो, मूतखडाही होऊ शकतो, असं डॉ. आदित्य येळीकर यांनी सांगितलं.
advertisement
आरओचे पाणी पितांनी आपल्याकडील आरओच्या पाण्याची टीडीएस उपकरणाने तपासणी करत गरजेचे आहे. आरओ केंद्राच्या मालकाला पाण्यातील टीडीएसचे प्रमाण 50 ते 150 मि.ग्रॅ./लि. ठेवण्यास सांगा. 50 पेक्षा कमी आणि 150 पेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी आरोग्यासाठी हितकारक नाही, असं डॉ. आदित्य येळीकर यांनी सांगितलं.
advertisement
ज्या पाण्यामध्ये सर्व घटक असतील असेच पाणी प्यायला पाहिजे. कारण की त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोग होणार नाही किंवा कुठलेही वाईट परिणाम हे आपल्या शरीरावरती होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही पाणी पिताना ते पाणी चांगलं आहे का किंवा त्यामध्ये किती टीडीएस आहे हे बघूनच ते पाणी प्यावं, असंही डॉ. आदित्य येळीकर यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
May 24, 2025 7:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Water : आरओ किंवा जारचे पाणी पिताय? लगेच बदला सवय, नाहीतर गंभीर आजाराला जावे लागेल समोर

