अमरावती पालिकेत निकाल फिरला, रवी राणांना मोठा धक्का, भाजपची आघाडी, काँग्रेसची काँटे की टक्कर
- Published by:Sachin S
Last Updated:
अमरावती महापालिका निवडणुकीमध्ये एकूण ८७ जागांसाठी निवडणूक लढवली जात आहे. पण, यावेळी भाजपसोबत राहुन आमदार रवी रााणा यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला
अमरावती : अमरावती महापालिका निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडलं. आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टपाली मतमोजणी करण्यात आली आहे. टपाली मतदानामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने ४ तर राष्ट्रवादी ४ जागांवर आघाडीवर आहे. तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानीला धक्का बसला आहे.
अमरावती महानगरपालिका- एकूण जागा- 87
टपाली मतदानाची आकडेवारी
भाजप-04
शिवसेना- 0
राष्ट्रवादी- 03
ठाकरे- 00
काँग्रेस- 3
मनसे-00
शरद पवार गट-00
युवा स्वाभिमान-01
इतर-००
अमरावती महापालिका निवडणुकीमध्ये एकूण ८७ जागांसाठी निवडणूक लढवली जात आहे. पण, यावेळी भाजपसोबत राहुन आमदार रवी रााणा यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजप आणि राणा यांच्यामध्ये वाद पेटला होता. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली असून सर्वात जास्त उमेदवार दिले आहे. तर रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पार्टीने महत्त्वाच्या जागेवर उमेदवार उभे केले आहे. पण, तरीही माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजपसाठी जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे राणांच्या घरातूनच वेगळं चित्र पाहण्यास मिळालं.
advertisement
तर काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युती करून निवडणूक लढत आहे. तर या ठिकाणी एमआयएम सुद्धा स्वबळावर निवडणूक लढत आहे. त्यामुळे निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 10:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अमरावती पालिकेत निकाल फिरला, रवी राणांना मोठा धक्का, भाजपची आघाडी, काँग्रेसची काँटे की टक्कर









