पूजेच्या साहित्याचा व्यवसाय, महिलांना घरबसल्या रोजगार; कमाई हजारोंची!
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
महिलांना घरीच कच्चा माल पुरवून पूजेसाठी लागणाऱ्या कापसाच्या फुलमाळा, फुलवाती तयार करण्याचं काम त्या मागील 8 वर्षांपासून करताहेत.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : घरात किंवा मंदिरात, विधीवत पूजा करायचं म्हटलं की, पूजेचं पूर्ण साहित्य असावं लागतं. बाजारात या प्रत्येक साहित्याची विशिष्ट किंमत असते. त्यामुळे त्यांचा व्यवसाय केल्यास त्यातून चांगला नफा मिळू शकतो. जालना शहरातील पूजा जाधव यांनी याच विचारातून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मुख्य म्हणजे यामागे त्यांचा व्यापक दृष्टिकोन होता. त्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून तब्बल 2 हजार महिलांना रोजगार मिळवून दिला आहे.
advertisement
स्त्री लाभ इंटरप्रायजेसच्या माध्यमातून महिलांना घरीच कच्चा माल पुरवून पूजेसाठी लागणाऱ्या कापसाच्या फुलमाळा, फुलवाती तयार करण्याचं काम त्या मागील 8 वर्षांपासून करताहेत. हा व्यवसाय त्यांनी कसा सुरू केला आणि त्यातून सध्या त्यांची कमाई किती आहे, जाणून घेऊया.
advertisement
जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या सामान्य कुटुंबातील पूजा जाधव यांनी मार्केटिंग क्षेत्रात काम केलं. परंतु मुलांना घरी सोडून जावं लागायचं म्हणून त्यांनी स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं. त्यातूनच पूजेचं साहित्य बनवण्याची कल्पना त्यांना सुचली. 2017 मध्ये त्यांनी घरीच स्वतः हा व्यवसाय करण्यात सुरुवात केली. हळूहळू पूजेच्या साहित्यासाठी मागणी वाढत गेली. त्यामुळे त्यांनी व्यवसायाला मोठं रूप देण्याचा निर्णय घेतला.
advertisement
सुरुवातीला 10 महिलांना, त्यानंतर हळूहळू 50 महिलांना त्यांनी काम देण्यास सुरूवात केली. आता त्यांच्या स्त्री लाभ इंटरप्रायजेस अंतर्गत तब्बल 2000 महिलांना त्या कच्चामाल पुरवून त्यातून फुलमाळी आणि फुलवाती तयार करतात. हे प्रॉडक्ट्स केवळ मुंबई, पुणे आणि नागपुरात जात नाहीत, तर चेन्नई, दिल्ली आणि भोपाळसारख्या मोठ्या शहरांमध्येही त्यांचा पुरवठा केला जातो.
advertisement

पूजा जाधव
या व्यवसायासाठी आम्हाला जास्त जागा लागली नाही. महिलांसाठीही हा व्यवसाय अत्यंत सोयीचा आहे. प्रत्येक महिलेची या कामातून प्रति महिना 5 हजारांपासून 15000 रुपयांची कमाई होते. महिला सशक्तीकरण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या या व्यवसायातून आम्हाला दरमहा 60 ते 70 हजार रुपये उत्पन्न मिळतं, असं पूजा जाधव यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
June 29, 2024 1:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
पूजेच्या साहित्याचा व्यवसाय, महिलांना घरबसल्या रोजगार; कमाई हजारोंची!