Innovative Idea: यंदा गुलाल आपलाच! विद्यार्थ्यांना मिळातायत निवडणूक प्रक्रियेचे धडे, मुख्यमंत्री अन् मंत्रीपदही ठरली
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
शालेय वयातच विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी यासाठी जालन्यातील नेत्रदीप विद्यालय मोतीगव्हाण या शाळेत निवडणूकीचे आयोजन करण्यात आले होते.
जालना: लोकशाही हा आपल्या देशाचा भक्कम पाया आहे. लोकशाहीत निवडणूकीला अनन्यसाधारण असं महत्व असतं. निवडणूक कशी पार पडते याबाबती ठळक माहिती आपल्याला माहित असते. परंतु प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेपासून आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी यासाठी जालन्यातील नेत्रदीप विद्यालय मोतीगव्हाण या शाळेत निवडणूकीचे आयोजन करण्यात आले होते.
राजकारणाचा सध्याचा खालावलेला स्थर पाहता विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेविषयी जागरूक राहावे. त्यांना ही प्रक्रिया इंतभूत कळावी. भविष्यात यापैकीच एखादा विद्यार्थी चांगला लोकप्रतिनिधी होवू शकतो. हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही विद्यार्थी संसदेची निवडणूक आयोजित करण्यात आली.
Success Story: आयटी क्षेत्रातील नोकरी सोडली, तरुणानं सुरू केलं फूड आऊटलेट, महिन्याला तब्बल एवढी कमाई
advertisement
तंतोतंत निवडणूक आयोगाप्रमाने जबाबदारी वाटप आणि नियोजन करण्यात आले. नामनिर्देशन भरण्यापासून ते मतमोजणी पर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी राबविण्यात आली. या निवडणुकीत 18 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. त्यापैकी सात उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले.
सर्वाधिक मते मिळवणाऱ्या उमेदवारास शाळा प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले. तर उर्वरित सहा विजयी उमेदवार यांना वेगवेगळी खाती देण्यात येणार आहे. यामध्ये शिस्तपालन मंत्री, स्वच्छता मंत्री, आरोग्य मंत्री अशी खाती देण्यात येणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक बी. पी. परिहार यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
advertisement
आम्हाला हा उपक्रम अतिशय आवडला. यातून निवडणुकीविषयी बरीच माहिती मिळाली. शाळेचा मुख्यमंत्री म्हणून मला विद्यार्थ्यांनी निवडले याबद्दल मी त्यांची आभारी आहे. विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याचा मी कसोशीने प्रयत्न करेन, असं शाळा प्रतिनिधी म्हनून निवड झालेली विद्यार्थीनी श्रावणी मोहिते हिने सांगितले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jul 20, 2025 11:46 AM IST
मराठी बातम्या/जालना/
Innovative Idea: यंदा गुलाल आपलाच! विद्यार्थ्यांना मिळातायत निवडणूक प्रक्रियेचे धडे, मुख्यमंत्री अन् मंत्रीपदही ठरली






