advertisement

Jalna News : जालना: सोनोग्राफीपूर्वी पोटाला ऍसिड लावलं, गरोदर महिला जखमी, बाळ बचावलं, भोकरदनमधील धक्कादायक प्रकार

Last Updated:

Jalna News : प्रसूतीसाठी दाखल असलेल्या एका गर्भवती महिलेला सोनोग्राफीपूर्वी जेलीऐवजी ऍसिड लावल्याने ती गंभीर भाजली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

News18
News18
रवी जयस्वाल, प्रतिनिधी, जालना: रुग्णालयातील हलगर्जीच्या अनेक घटना समोर येत असतात. जालना जिल्ह्यातील भोकरदन ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसूतीसाठी दाखल असलेल्या एका गर्भवती महिलेला सोनोग्राफीपूर्वी जेलीऐवजी ऍसिड लावल्याने ती गंभीर भाजली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिला संदीप भालेराव (वय 28) असं या जखमी महिलेचं नाव आहे. शीला भालेराव या सोनोग्राफीसाठी बुधवारी सकाळी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र, सोनोग्राफी करण्यापूर्वी नर्सने जेलीऐवजी अॅसिड लावले. मात्र, काही वेळेतच जळजळ होऊ लागली, शीला यांच्या पोटावर वेदना होऊ लागली, सूजही दिसली.
हा गंभीर प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने शीलावर उपचार सुरू झाले. तर, दुसरीकडे या धक्कादायक सोनोग्राफीच्या अर्धा तासानंतर महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ सुखरूप असून, त्याच्या प्रकृतीत कोणताही धोका नाही. मात्र महिलेल्या पोटासह अवघड जागा भाजल्याने महिलेवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
advertisement
या घटनेनंतर महिलेचे नातेवाईक संतप्त झाले. या धक्कादायक घटनेबाबत त्यांनी नर्सला विचारणा केली. पण, नर्सने त्यांच्यावर आरडाओरड केली आणि रुग्णालयातून दोन तासांसाठी गायब झाली होती.
या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. रुग्णाची सुरक्षा आणि उपचार प्रक्रियेतील बेजबाबदारी पुन्हा एकदा समोर आली आहे. स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna News : जालना: सोनोग्राफीपूर्वी पोटाला ऍसिड लावलं, गरोदर महिला जखमी, बाळ बचावलं, भोकरदनमधील धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement