advertisement

विधवा पेन्शन योजनेसाठी पत्नीचं धक्कादायक पाऊल, पतीला जिवंतपणीच...; जालन्यातील प्रकाराने खळबळ

Last Updated:

Jalna News: संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी जालन्यातील एका महिलेनं चक्क जिवतं पतीलाच मृत घोषित केलंय. आता पतीनेच या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीये.

+
भिकाजी

भिकाजी गाढे

जालना: विधवा, परित्यक्ता, एकल, निराधार महिलांना शासनाकडून दरमहा अनुदान दिले जाते. परंतु, जालन्यातून एक भलताच प्रकार पुढे आला आहे. स्वतः चा पती हयात असताना ते मृत असल्याचे दाखवून एक महिला चक्क आठ वर्षांपासून निराधार योजनेचा लाभ घेत आहे. विशेष म्हणजे हे प्रकरण खुद्द त्या महिलेच्या पतीनेच उघडकीस आणले असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
प्रशासकीय दिरंगाईची आणि लाल फितशाहीची अनेक उदाहरणे तुम्ही आपल्या आजूबाजूला पाहिलीच असतील. मात्र, जालन्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव येथील एका आजोबांनी आपली पत्नी आपण हयात असतानाच विधवा महिलांना मिळणारे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाटत असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून ते न्याय मागत संबंधित कार्यालयांच्या चकरा मारत आहेत. भिकाजी गाडे असं 71 वर्षीय आजोबांचं नाव आहे.
advertisement
भिकाजी गाडे यांना स्वतःच्याच पत्नीने मृत घोषित करून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला आहे, अशी तक्रार पतीनेच जिल्हाअधिकाऱ्यांकडे केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील आठ वर्षांपासून या योजनेचा लाभ महिलेने घेतला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही बाब पतीच्या लक्षात आल्याने पतीने अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन याचा जाब विचारला आहे.
advertisement
दरम्यान, सतत तक्रारी देऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याने नेमका न्याय मागायचा तरी कुणाकडे? असा सवाल तक्रारदार भिकाजी गाडे यांनी उपस्थित केलाय. याबाबत मागील सहा महिन्यांपासून गाडे यांनी ही निराधार योजना मंजूर केली कशी? याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र घनसावंगी तहसीलमधील अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही उत्तर देत नसल्याचे गाडे यांनी म्हटलंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
विधवा पेन्शन योजनेसाठी पत्नीचं धक्कादायक पाऊल, पतीला जिवंतपणीच...; जालन्यातील प्रकाराने खळबळ
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement