advertisement

Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणाचे पडसाद, पुण्यातील ग्रामस्थाने घेतला आदर्श निर्णय, Video

Last Updated:

पुण्यातील धायरी ग्रामस्थांनी बैठक आयोजित करत बैठकीत समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. धायरी गावात ग्रामस्थांनी एकत्र येत हुंडा आणि लग्नातील प्रथांविरोधात ठोस पाऊल उचलले आहे.

+
News18

News18

पुणे : पुणे येथील वैष्णवी हगवणे हुंड्यासाठी आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेनंतर, मराठा समाजात पुन्हा एकदा विवाह पद्धतीतील त्रुटी, हुंडा पद्धतीचा आणि कौटुंबिक हस्तक्षेपासारख्या समस्यांवर गंभीर चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, पुण्यातील धायरी ग्रामस्थांनी बैठक आयोजित करत बैठकीत समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. धायरी गावात ग्रामस्थांनी एकत्र येत हुंडा आणि लग्नातील प्रथांविरोधात ठोस पाऊल उचलले आहे. त्यांनी एक ऐतिहासिक ठराव मंजूर केला असून, गावात याची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.
धायरी ग्रामस्थांनी घेतलेले हे निर्णय फक्त शब्दापुरते न राहता प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी गावात 17 ते 18 ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश आहे:
1. हुंडा देणे किंवा घेणे पूर्णतः बंद.
2. समाजाच्या दबावामुळे मुलींवर लग्नासाठी जबरदस्ती न करणे.
advertisement
3. गावात विशेष समिती स्थापन करून छळ झाल्यास मदत व मध्यस्थी करणे.
4. लग्नाचा खर्च कमी ठेवणे - लहान, साध्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने लग्न करणे.
5. वरात, डीजे, फटाके, अनावश्यक प्रदर्शन टाळणे.
6. साखरपुडा, हळद व लग्न एकाच दिवशी पार पाडणे.
7. प्री-वेडिंग शूट हे खासगी ठेवणे - त्याचे प्रदर्शन न करणे.
advertisement
8. समुदायिक विवाह प्रोत्साहन देणे.
9. पहिल्या बाळंतपणाचा खर्च मुलीच्या वडिलांनी नव्हे, तर नवऱ्याने करणे.
10. लग्नासाठी जमीन विकू नये - शिक्षण व उद्योगासाठी पैसा खर्च करावा.
या ठरावांना ग्रामस्थांचा भरघोस पाठिंबा मिळाला असून, गावभर या नियमांचे फलक लावण्यात येणार आहेत. या निर्णयांमागे एकच उद्देश आहे, वैष्णवीसारखी दुसरी एकही मुलगी अशा परिस्थितीत सापडू नये.
advertisement
मराठा समाजाने यामध्ये पुढाकार घेत ग्रामसभा आयोजित केली, जिथे समाजाच्या हितासाठी सकारात्मक चर्चा घडून आली. संपूर्ण राज्यात लगेच बदल घडणार नाही, पण अशा छोट्या गावांमधून सुरुवात झाली तर समाज नक्कीच बदलू शकतो, असे मत ग्रामस्थ राहुल पोकळे यांनी व्यक्त केले.
हा ठराव केवळ धायरी गावापुरता न राहता इतर गावांनीही अनुकरण करावा आणि सामाजिक परिवर्तनाचा भाग व्हावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणाचे पडसाद, पुण्यातील ग्रामस्थाने घेतला आदर्श निर्णय, Video
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement