Police Bharati 2025: जालना पोलीस दलात मेगा भरती, लगेच करा अर्ज, शेवटची तारीख किती?

Last Updated:

Police Bharati 2025: खाकी वर्दीचं स्वप्न पाहमाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. जालना पोलीस दलात 156 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Police Bharati 2025: जालना पोलीस दलात मेगा भरती, लगेच करा अर्ज, शेवटची तारीख किती?
Police Bharati 2025: जालना पोलीस दलात मेगा भरती, लगेच करा अर्ज, शेवटची तारीख किती?
जालना: पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे. जालना पोलीस दलात 156 पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. 156 पोलिस शिपाई पदांसाठी ही भरती होत असून बुधवारी, 29 ऑक्टोबरपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील तरुणांसाठी ही मोठी संधी असणार आहे.
पोलीस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण-तरुणी गाव, शहरात भरतीची तयारी करताना दिसतात. अनेकांनी तर शहरातील पोलीस करिअर अकॅडमी जॉईन केल्या आहेत. अशातच पोलिस अधीक्षक, जालना आस्थापनेवर रिक्त असलेल्या पोलिस शिपाई पदांच्या 156 जागा भरतीची जाहिरात पोलिस विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती पोलिस विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
advertisement
असे असणार गुणांकन
मैदानी चाचणी 50 गुण: यामध्ये गोळाफेक 15 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, 1600 मीटर (पुरुष), आणि 800 मीटर (महिला) धावणे 20 गुण असणार आहे. तसेच 50 टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांपैकी प्रवर्गनिहाय 1:10 प्रमाणात उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरणार आहे.
advertisement
लेखी परीक्षा 100 गुण: यामध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, मराठी व्याकरण आदींचा समावेश आहे. तसेच उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
पोलीस अधीक्षक आस्थापनेवर 2024-25 या वर्षातील रिक्त असलेल्या 156 पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्या संबंधित जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा पारदर्शकपणे राबवली जाणार आहे. यामध्ये कॅमेरा, इन कॅमेरा तपासणी, आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ठिकठिकाणी मायक्रो कॅमेरे असणार आहेत. यापूर्वी विविध परीक्षेत जे उमेदवार गैरकृत्य करताना आढळले त्यांच्यावर विशेष लक्ष असणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Police Bharati 2025: जालना पोलीस दलात मेगा भरती, लगेच करा अर्ज, शेवटची तारीख किती?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement