Vidhansabha Election : विधानसभेपूर्वी राज्यात घडामोडींना वेग! पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

Last Updated:

Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.

News18
News18
जालना, (रवी जैस्वाल, प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून राजकीय घडामोडींना वेग आले आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी राजकीय नेत्यांची रीघ लागली आहे. आता माजी मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. बैठकीत नेमकं काय ठरलं? याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे.
चव्हाण आणि जरांगेंमध्ये बंद दाराआड चर्चा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत माजी खासदार रजनीताई पाटील ह्यादेखील उपस्थित आहेत. पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली. मागच्याच आठवड्यात स्वराज्य संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती. बैठकीनंतर दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपली भूमिकाही स्पष्ट केली होती.
advertisement
जरांगे पाटलांचा इशारा
मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण दिले नाही तर राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे. यावरुन सरकारला इशारा देखील दिला आहे. मनोज जरांगे पाटील येत्या 29 ऑगस्टला आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या राजकीय निर्णयामुळे महायुतीसह महाविकास आघाडीत्या नेत्यांचं टेन्शन वाढले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. लोकसभेला मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर चांगला चालला होता. महायुतीला मोठ्या प्रमाणात याचा फटका बसला. मराठवाड्यात तर भाजपला सर्वात मोठा धक्का बसला. भाजपच्या लोकसभेला 13 जागा कमी झाल्या. त्यामुळे विधानसभेतही जरांगे फॅक्टर चालला तर महायुतीचे सरकार जाऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/जालना/
Vidhansabha Election : विधानसभेपूर्वी राज्यात घडामोडींना वेग! पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement