Jalna News : जालन्यात 17 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Last Updated:

मोठी बातमी समोर येत आहे. जालना जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

News18
News18
जालना, 4 सप्टेंबर, रवी जैस्वाल : मोठी बातमी समोर येत आहे. जालना जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. येत्या 17 सप्टेंबरपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं सुरू केलेल्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला. त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं असून, जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आजपासून जालना जिल्ह्यात कलम 144 नुसार जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
जालन्यात तणावपूर्ण शांतता 
अप्पर जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार जालना जिल्ह्यात आजपासून येत्या 17 सप्टेंबरपर्यंत कलम 144 अतंर्गत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातही तणावपूर्ण शांतता असून, अंबड चौफुलीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज्यात तिसऱ्या दिवशीही आंदोलन 
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याची घटना घडली होती. यानंतर आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरातून या लाठीचार्जचा निषेध करण्यात येत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी राज्यात आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे. याचा मोठा फटका हा एसटी वाहतुकीला बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna News : जालन्यात 17 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement