कणखर बापाचा हळवा लेक! अजितदादांच्या आठवणीत जय पवारांची भावुक पोस्ट, म्हणाला, "कायम माझ्या मनात..."
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर आपल्या वडिलांच्या आठवणीत एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, नऊ दिवस उलटूनही अजितदादा आता आपल्यात नाहीत, या सत्यावर अद्याप कोणाचाही विश्वास बसत नाहीये. अजित पवारांच्या अचानक जाण्याने केवळ पवार कुटुंबच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. दरम्यान, त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर आपल्या वडिलांच्या आठवणीत एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.
"डॅड, माझा प्रत्येक काळ, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील," अशी पोस्ट जय पवारांनी लिहिली आहे. यासोबत त्याने अजित दादांसोबत एक फोटोही शेअर केला आहे. ज्यात तो अजित पवारांसोबत कोणत्या तरी विषयावर गप्पा मारताना दिसत आहे.
advertisement
जय पवारांनी दोन दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारची पोस्ट इन्स्टाग्रामवर लिहिली होती. त्यांनी इन्स्टावर दोन फोटो शेअर करत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती. यातला पहिला फोटो अजित पवार आणि जय पवार यांचा होता. ते एका तलावाच्या बाजुला निसर्गरम्य ठिकाणी हाताची घडी घालून उभे होते. या फोटोवर जयने 'तुमची खूप आठवण येतेय, डॅड' असं कॅप्शन लिहिलं होतं.
advertisement
तर दुसऱ्या फोटोत जयने अजित पवारांना मिठी मारल्याचा फोटो शेअर केला होता. यात त्यानं लिहिलं की, "डॅड, काश वेळ थांबली असती... मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो." या शब्दांतून वडिलांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आणि मुलाचे वडिलांप्रति असलेले अतोनात प्रेम दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा जयने अजितदादांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 9:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कणखर बापाचा हळवा लेक! अजितदादांच्या आठवणीत जय पवारांची भावुक पोस्ट, म्हणाला, "कायम माझ्या मनात..."







