रडली नाही तर वाघीण होऊन लढली! २० दिवसांचा वनवास संपला; राज ठाकरेंचा शब्द अन् डोंबिवलीच्या 'शोरमा गर्ल'ची नवी भरारी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शोरमा गर्ल एकता सावंतने डोंबिवलीत संघर्ष करून मनसेच्या मदतीने पुन्हा व्यवसाय सुरू केला. अविनाश जाधव यांच्या हस्ते गाडीचे उद्घाटन झाले.
मागच्या काही दिवसांपासून शोरमा गर्लचे व्हिडीओ व्हायरल झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. शोर्मा गर्ल एक मराठी मुलगी जी डोंबिवलीत आपली छोटी गाडी लावते. बँकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून या मुलीनं शोरमाचा व्यवसाय सुरू केला. अगदी कमी वेळात मिळालेली तिची प्रसिद्धी काहींना पाहावली नाही आणि कुरापती सुरू झाल्या. मराठी आणि त्यात एकटी मुलगी व्यवसाय करते तिला यश मिळतं हे खुपायला लागलं आणि सुरू झाला संघर्ष.
लोक त्रास देतात म्हणून शोर्मा गर्ल डगमगली नाही, तर मराठी बाणा आणि वाघीण होऊन या सगळ्यांशी लढली, तिने व्हिडीओ केला, पाहता पाहता तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि तिला मनसैनिकांची साथ मिळाली. मनसैनिक तिच्या मदतीला धावू आले. ती रडली नाही तर लढली आणि पुन्हा नव्या जोमानं उभी राहिली. महिन्याभराच्या संघर्षानंतर अखेर तिला पुन्हा त्याच जागेवर तिची गाडी सुरू करण्याची संधी मिळाली.
advertisement
मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते तिच्या नव्या गाडीचं उद्घाटन करण्यात आलं. डोंबिवलीच्या शोरमा गर्लने पुन्हा एकदा नव्याने व्यवसाय सुरू केला आहे. मनसेच्या हस्तक्षेपानंतर तिला पुन्हा एकदा व्यवसाय करता आला. एकता सामंत हिने मनसैनिक आणि मनसेचे मनापासून आभार मानले. मनसे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याने तिला लढण्याचं बळ मिळालं आणि त्यांच्या साथीनं हे शक्य झाल्याचं तिने म्हटलं आहे.
advertisement
बाहेरुन आलेले लोक व्यवसाय करतात आणि आपले लोक त्यांची गाडी लागत नाही म्हणून दारोदारी फिरतात ही गोष्ट चुकीची होती. आम्ही ठरवलं तिच्या पाठीशी उभं राहायचं.एकताने प्रतिक्रिया देताना म्हटलं की दोन वर्षांपासून इथे सगळे स्टॉल लावत होते आणि माझ्या एकटीचाच स्टॉल बंद केला जात होता. इथले लोक सगळे हे पाहून हसत होते. 20 दिवसांपासून माझा स्टॉल बंद होता तेव्हा कुठे गेले हे सगळे? माझ्याकडे पैसे नव्हते मी रेंटने गाडी वापरत होते. मात्र मनसेनं मला खूप सुंदर गाडी व्यवसाय करण्यासाठी घेऊन दिली. अविनाशदादांनी सगळं दिलं शून्यापासून ते इथपर्यंत सगळी मदत मला आज त्यांनी केली आहे. त्याचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. या सगळ्याचा मला खूप आनंद आहे.
advertisement
एकता सावंत ही याआधी बँकेत नोकरी करायची, चांगल्या पगाराची नोकरी होती मात्र जाण्याची वेळ होती घरी परतण्याची नाही. कामाचे तास आणि प्रेशर प्रचंड होतं. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आणि व्यवसाय करायचा हे डोक्यात खूप पक्क होतं, त्यामुळे ते करण्याच्या अनुशंगानेच हे सगळं सोडलं. भाड्याने गाडी घेतली आणि शोरमाच्या व्यवसायाला सुरुवात केली. हळूहळू चव आवडायला लागल्याने लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र मराठी माणूस पुढे गेलेला नको होता त्यामुळे सतत माझीच गाडी बंद करण्यासाठी त्रास दिला जात होता असंही एकताने सांगितलं आहे.
advertisement
advertisement
कल्याण डोंबिवलीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद या निमित्ताने पुन्हा समोर आला. मराठी माणसाला लोकांची साथ मिळत नाही ही खंत तिने आपल्या व्हिडीओंमधून बोलून दाखवली होती. मात्र ही वाघीण होऊन लढली, नडली आणि भिडली देखील. त्यामुळे आज पुन्हा महिन्याभरानंतर तिला तिचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मनसेनं साथ दिली आणि तिचा व्यवसाय सुरू होत आहे. याचा तिला खूप आनंद असल्याचं शोरमा गर्ल एकतानं सांगितलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 05, 2026 9:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रडली नाही तर वाघीण होऊन लढली! २० दिवसांचा वनवास संपला; राज ठाकरेंचा शब्द अन् डोंबिवलीच्या 'शोरमा गर्ल'ची नवी भरारी







