मतचोरीचा मुद्दा पेटला! मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, जयंत पाटलांची पडळकरांवर जहरी टीका
- Reported by:Asif Mursal
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सर्व जातीवर प्रेम करा.पण समजामध्ये भेद करू नका... हा जिल्हा जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली घेतो, अशी टीका जयंत पाटील यांनी पडळकर यांच्यावर केली.
सांगली : मत चोरीच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि जत विधानसभेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील युद्ध अजूनही संपलेलं नाही. सभा असू दे की पत्रकार परिषद असो पडळकर आणि जयंत पाटील एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.आजही सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जहकरी टीका केला आहे. माझा प्रॉब्लेम आहे की, मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. सांगलीमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन परिषदमध्ये बोलत होते.
माझा प्रॉब्लेम काय आहे की मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही... पण मुद्दा काय आहे, मतचोरी झाली तिथे राजीनामा द्या आणि परत निवडणुका घ्या. आता हे महिनाभर चालेल. समाजामध्ये असेही काही लोक असतात जे निंदा करतात, अलीकडे मी ही अशी लोक तयार करू लागलो आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे.
advertisement
जिल्हा जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली पण घेतो: जयंत पाटील
या देशांमध्ये अलीकडे मोठा प्रॉब्लेम झाला आहे. वाचाळवीरांची फार संख्या वाढली आहे. वरिष्ठ यांच्याकडे कधी बघणार आहे. सर्व जातीवर प्रेम करा.पण समजामध्ये भेद करू नका... हा जिल्हा जसा डोक्यावर घेतो तसा पायाखाली घेतो, अशी टीका जयंत पाटील यांनी पडळकर यांच्यावर केली.
advertisement
देशात उपराष्ट्रपती गायब होऊ शकतो तर... जयंत पाटील यांची टीका
तसेच या सरकारने ही सत्ता वोट चोरीने ही सत्ता मिळवली आहे. लोकशाहीवर घाला घालणाऱ्याना आपण किती पोसायचं आणि त्याचा विचार आपण केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला तुमच्या माझ्या मताचा अधिकार दिला त्याला सुरुंग लावण्याचं काम यांनी केले. या देशात कोणाला खड्ड्यात घालायचा आणि कोणाला वर काढायचं या पाठीमागे एक शक्ती काम करू लागले. या देशात उपराष्ट्रपती गायब होऊ शकतो. तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती, असेही पाटील म्हणाले.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
Aug 30, 2025 8:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मतचोरीचा मुद्दा पेटला! मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, जयंत पाटलांची पडळकरांवर जहरी टीका











