...अन्यथा दिवाळीचं सामान मिळणार नाही, पुण्यातल्या कुंभारवाड्यात दरेकरांच्या दुकानाची चर्चा
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
पुण्यातील कुंभारवाडा येथे दिवाळीनिमित किल्ले, मातीचे दिवे,छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र ह्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या ग्राहकाला कोणतीही वस्तू मिळणार नाही, अशी संकल्पना राबवणाऱ्या व्यावसायिक जयेश दरेकर यांची सर्वत्र चर्चा होत आहे.
दिवाळी जवळ आली आहे आणि बाजारपेठांमध्ये सणासुदीचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. अशाच या सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कुंभारवाडा येथे किल्ल्यांच्या, शिवाजी महाराजांच्या मूर्तींच्या, दिव्यांच्या आणि सजावटीच्या वस्तूंच्या विक्रीला मोठी चालना मिळाली आहे.
छोटे- मोठे विक्रेते आणि कलाकार आपल्या कलाकृतींनी ग्राहकांना आकर्षित करत आहेत. परंतु याच परिसरात एक दुकान वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरले आहे. याबाबतची अधिक माहिती व्यावसायिक जयेश दरेकर यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
कुंभारवाड्यातील ‘शिवण्या आर्ट्स’ या नावाने ओळखले जाणारे जयेश दरेकर यांचे दुकान दिवाळीच्या दिवसांत नेहमीच गर्दीने फुललेले असते. मात्र, दरेकर यांचा एक नियम सर्वांनाच थांबवून विचार करायला भाग पाडतो. त्यांच्या मते, जो ग्राहक “शिवाजी महाराज” यांना फक्त “शिवाजी” किंवा “शिवराय” असा एकेरी उल्लेख करतो, त्याला ते कोणतेही सामान विकत देत नाहीत. जयेश दरेकर यांचे म्हणणे आहे की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हे तर हिंदवी स्वराज्याचे प्रणेते आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख करताना ‘महाराज’ हा सन्मानपूर्वक शब्द लावणं ही आपली जबाबदारी आहे. जो त्यांच्या नावाचा आदर ठेवत नाही, त्याला माझ्याकडून कोणतीही मूर्ती, किल्ला किंवा सजावटीची वस्तू मिळणार नाही.”
advertisement
जयेश दरेकर यांचा दुकानावरील फलक पाहिल्यानंतर काही ग्राहकांना सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटलं, पण लगेचच त्यांनीही दरेकर यांच्या भूमिकेचं स्वागत केलं. अनेकांनी सांगितलं की, या छोट्या पण ठाम भूमिकेमुळे समाजात आदर आणि संस्कार जपले जात आहेत. दरेकर यांच्या दुकानात विविध प्रकारचे सुंदर किल्ले, मातीच्या मूर्ती, पारंपरिक दिवे आणि शिवरायांच्या युद्धातील प्रसंग दाखवणाऱ्या कलाकृती उपलब्ध आहेत. त्यांच्या हातातून बनणाऱ्या वस्तूंमध्ये कलेचा आणि भक्तीचा संगम दिसतो. दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या अनेक पुणेकरांनी सांगितले की, “आजच्या काळात जेथे व्यापार आणि नफा महत्त्वाचा ठरतो, तेथे अशा कलाकाराने आपल्या श्रद्धेचा आणि आदराचा ठाम संदेश दिला आहे, हे अभिमानास्पद आहे.” जयेश दरेकर यांचा हा निर्णय आता चर्चेचा विषय बनला असून, “छत्रपतींच्या नावाचा सन्मान ठेवणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने असा आदर्श घ्यावा,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 14, 2025 3:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...अन्यथा दिवाळीचं सामान मिळणार नाही, पुण्यातल्या कुंभारवाड्यात दरेकरांच्या दुकानाची चर्चा