BJP Shiv Sena Shinde Faction: राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंचा गेम
- Reported by:AJIT MANDHARE
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Kalyan Dombivli News : राज्याचे लक्ष मतमोजणीकडे लागले असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी डाव साधला. चव्हाण यांनी एकाच दगडात शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांचा गेम केला आहे.
कल्याण-डोंबिवली: राज्याचे लक्ष मतमोजणीकडे लागले असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी डाव साधला. चव्हाण यांनी एकाच दगडात शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांचा गेम केला आहे. रविंद्र चव्हाण यांच्या खेळीमुळे थेट शिवसेना शिंदे-भाजप यांची युती धोक्यात आल्याची चर्चा आहे. डोंबिवलीतून महायुतीतील भाजपा–शिवसेना युती पुन्हा एकदा अडचणीत आल्याचे संकेत मिळत आहेत. फोडाफोडीच्या राजकारणामुळे आधीच तणावात असलेल्या या युतीत आता नवा वाद उफाळून आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज डोंबिवली दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या उपस्थितीत मनसेच्या माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची तयारी सुरू होती. मात्र, त्याआधीच राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी रात्रीत त्या माजी नगरसेविकेचा भाजपात प्रवेश करून घेतल्याने शिवसेना गटात तीव्र नाराजी पसरली आहे.
या अनपेक्षित खेळीमुळे भाजपा आणि शिवसेना यांच्यातील अंतर्गत समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत,“ बात दूर तर जाएगी,” अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे.
advertisement
रविंद्र चव्हाण यांच्या या हालचालीला शिवसेनेत थेट ‘राजकीय धक्का’ मानले जात असून, डोंबिवलीत स्थानिक पातळीवर मोठा असंतोष निर्माण झाला आहे. काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत, “युतीत असताना अशा प्रकारची पावले विश्वासघातासारखी आहेत,” असा आरोप केला आहे.
एकीकडे महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असताना, दुसरीकडे फोडाफोडीचे राजकारण अजूनही थांबले नसल्याचे दिसून आले आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या फोडाफोडीचा वाद थेट दिल्लीपर्यंत पोहचला होता. त्यानंतर दोन्ही बाजूने एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांना प्रवेश न देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. डोंबिवलीतील या घडामोडींचे पडसाद राज्याच्या राजकारणात कितपत उमटतात, आणि युतीतील तणाव कुठपर्यंत वाढतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 11:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Shiv Sena Shinde Faction: राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंचा गेम









