कोल्हापुरात शरद पवारांना दणका, बडा नेता पुन्हा भाजपमध्ये, प्रवेशाच्या आधीच बैठकांना हजेरी

Last Updated:

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली. एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा जोर असायचा. मात्र बदलेल्या राजकारणाच्या परिस्थितीत या पट्ट्यात राष्ट्रवादीला मोठे नुकसान सहन करावे लागले.

शरद पवार
शरद पवार
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले समरजित घाटगे पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे. त्यांच्या प्रवेशाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली. एकेकाळी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा जोर असायचा. मात्र बदलेल्या राजकारणाच्या परिस्थितीत या पट्ट्यात राष्ट्रवादीला मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे पक्षाला एकामागून एक धक्के बसत आहेत. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडून येण्यात समरजित घाटगे यांना अपयश आल्याने राष्ट्रवादीत राहण्याबाबत त्यांच्या मनात किंतू परंतु होते. आता महापालिका निवडणूक सरताच जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये प्रवेश करतील.
advertisement
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगांने भारतीय जनता पक्षाच्या बैठका होत आहेत. कोल्हापुरातील बैठकीला समरजीत घाटगे यांनी हजेरी लावली. यावेळी बंद खोलीत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. जिल्हा परिषद निवडणुकीत समरजित घाटगे गटाचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
समरजित घाटगे यांच्या प्रवेशावर विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांच्या भाजप प्रवेशाची आता औपचारिकता बाकी आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावरच लढविण्याचे ठरवले आहे.
advertisement

कोण आहेत समरजित घाटगे

समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे नेते आहेत
विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता
आता पुन्हा ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत
हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक जिंकण्यात त्यांना अपयश आले
हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे
नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत कागलमध्ये त्यांनी हातमिळवणी केली
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोल्हापुरात शरद पवारांना दणका, बडा नेता पुन्हा भाजपमध्ये, प्रवेशाच्या आधीच बैठकांना हजेरी
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement