वाढत्या शहरीकरणात कोल्हापुरकर होणार सुरक्षित; 'अग्निशमन' यंत्रणेने घेतला 'हा' मोठा निर्णय, हालचालींना वेग!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कोल्हापूर शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील संभाव्य हद्दवाढ लक्षात घेता, महानगरपालिका अग्निशमन विभागाने शहरात...
कोल्हापूर : शहराच्या उपनगरांत वाढत चाललेली लोकवस्ती आणि भविष्यातील संभाव्य हद्दवाढ लक्षात घेता महानगरपालिका अग्निशमन विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात आणखी तीन नवीन अग्निशमन स्थानके सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती अग्निशमन विभागाने नगररचना विभागाला केली आहे. सध्या शहराचा विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याने, त्यातच या जागा आरक्षित करण्याची तयारी सुरू आहे.
का गरजेची आहेत अग्निशमन स्थानके?
2011 च्या जनगणनेनुसार, एक लाख लोकसंख्येमागे एक अग्निशमन स्थानक असा नियम आहे. त्यानुसार कोल्हापुरात सध्या सहा स्थानके पुरेसी आहेत. मात्र, गेल्या 14 वर्षांत जनगणना झालेली नाही, त्यामुळे शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
भविष्यात हद्दवाढ झाल्यास अग्निशमन दलाच्या गाड्यांना मदत पोहोचवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, अग्निशमन विभागाने किमान तीन नवीन स्थानके सुरू करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. यासाठी अग्निशमन विभागाने नगररचना विभागाकडे जागा शोधण्याची विनंती केली आहे. सध्या शहराचा नवीन विकास आराखडा तयार होत असल्याने, त्यातच ही जागा आरक्षित ठेवणे सोपे होईल.
advertisement
कुठे शोधली जात आहे जागा?
नवीन अग्निशमन स्थानकांसाठी मार्केट यार्ड, शांतीनिकेतन, कळंबा, आपटेनगर अशा उपनगरांमध्ये जागेचा शोध घेतला जात आहे. शहराच्या जुन्या गावठाण भागात सध्या स्थानकांची तितकीशी गरज नाही, पण वाढत्या उपनगरांत त्यांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे नगररचना आणि अग्निशमन विभाग हे दोन्ही विभाग मिळून उपनगरांवर लक्ष केंद्रित करत आहेत.
जर या भागांमध्ये योग्य जागा उपलब्ध नसतील, तर त्या आरक्षित करून ताब्यात घेतल्या जातील, अशी माहिती मिळाली आहे. या संदर्भात बोलताना मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी सांगितले की, "शहराचा वाढता विस्तार आणि संभाव्य हद्दवाढ विचारात घेऊन आम्ही नगररचना विभागाला नवीन तीन स्थानकांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे."
advertisement
हे ही वाचा : कोल्हापुरात चोरट्यांचं खतरनाक धाडस! भरदुपारी-भरवस्तीत फोडलं घर, चोरी 'इतकी' मोठी की, पोलिसांचीही उडाली झोप!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 13, 2025 7:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
वाढत्या शहरीकरणात कोल्हापुरकर होणार सुरक्षित; 'अग्निशमन' यंत्रणेने घेतला 'हा' मोठा निर्णय, हालचालींना वेग!