कागलमध्ये हिस्ट्री रीपीट्स, 24 तासात राजकारण फिरलं,अनपेक्षित युती; शिंदेंची शिवसेना एकाकी
- Published by:Prachi Amale
- Reported by:Dnyaneshwar Pandurang Salokhe
Last Updated:
सत्तेचे नवे राजकीय गणित मांडणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात कागल तालुक्यात 24 तासांमध्ये मोठ्या उलथापालथी झाल्या
कोल्हापूर : नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांची सध्या राज्यात रणधुमाळी सुरू आहे. त्यातच राज्यात चंदगड तालुक्यात दोन राष्ट्रवादी पक्षांना एकत्र आणून सत्तेचे नवे राजकीय गणित मांडणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात कागल तालुक्यात 24 तासांमध्ये मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. राज्यात आणखी एका नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत,
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजित घाटगे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे संजय मंडलिक एकत्र आले. त्यामुळे कागलची वाट मुश्रीफांसाठी खडतर ठरण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र हसन मुश्रीफ यांनीही आपले राजकीय कौशल्य पणाला लावत कट्टर विरोधक असलेल्या समरजित घाटगेंशी आघाडी केली. मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर उपनगराध्यक्षपद समरजित घाटगे गटाला दिले आहे. त्यामुळे राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे. माजी खासदार संजय मंडलिक एकाकी पडल्याचे चित्र आहे.
advertisement
कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षित युती
दरम्यान कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षित युतीवर देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुश्रीफ यांनी म्हटले आहे, आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी- कागल यांची कागल नगरपरिषदेमध्ये आघाडी झाली. ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत न करता आली नाही. याबाबत मी या सर्वांची माफी मागतो. तसेच माझे ज्येष्ठ मित्र माजी आमदार संजयबाबा घाटगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागला. त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. या आघाडीमुळे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात होणार नाही. आपल्या झालेल्या चर्चेपासून मी ढळणार नाही. उलट; शिर्षस्थ नेतृत्वाबरोबर बसून त्यांच्या कार्यकर्त्यांना जादा दिलासा कसा मिळेल, याबाबत मी प्रयत्न करीन. माझ्या व संजयबाबांच्या चर्चेमधून गैरसमज पण दूर होईल, याची मला खात्री आहे.
advertisement
इतिहासाची पुनरावृत्ती
दरम्यान कागल तालुक्यामध्ये अशी आघाडी पहिल्यांदाच झालेली नाही. इतिहासाची पुनरावृत्ती (हिस्ट्री रीपीट्स) झालेली आहे. टोकाचा संघर्ष होऊनसुद्धा त्यावेळच्या नेत्यांनी तालुक्याच्या विकासासाठीसाठी व जनतेच्या कल्याणासाठी आघाड्या केल्या होत्या. कै. शामराव भिवाजी पाटील व कै. सदाशिवराव मंडलिकसाहेब, कै. सदाशिवराव मंडलिकसाहेब व कै. विक्रमसिंहराजे घाटगे, मी स्वतः व माजी आमदार संजयबाबा घाटगे. यावरून कागल तालुका हे जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापीठ का झाले? हे समजू शकेल. परंतु यामध्ये "ईडी" ची एक दुर्दैवी व कडवी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणे साहजिक आहे. चर्चेअंती तो संभ्रम व गैरसमज दूर झाला. "देर आये..... दुरुस्त आये.....!", असेही हसन मुश्रीफ म्हणाले.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
November 17, 2025 4:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कागलमध्ये हिस्ट्री रीपीट्स, 24 तासात राजकारण फिरलं,अनपेक्षित युती; शिंदेंची शिवसेना एकाकी


