Shiv Rajyabhishek 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी जलाभिषेकासाठी कसे संकलित केले जाते पवित्र जल? पाहा Video
- Published by:Aaditi Datar
Last Updated:
दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत असतो. महाराष्ट्रासह भारतभरातून येणाऱ्या हजारो लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा होत असतो.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासह जगभरातील कित्येकांचे आराध्य दैवत आहेत. शिवरायांचा राज्याभिषेक स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर संपन्न झाला होता. याच सोहळ्याच्या आठवण म्हणून दरवर्षी छत्रपती संभाजी राजांमार्फत शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत असतो. महाराष्ट्रासह भारतभरातून येणाऱ्या हजारो लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा होत असतो. या सोहळ्या दरम्यान वेगवेगळ्या सात ठिकाणाहून आणलेल्या पवित्र जलाचा अभिषेक छत्रपती शिवरायांच्या मूर्तीवर केला जात असतो. हे पवित्र जल आणण्याचे काम कोल्हापुरातील एक संस्था गेली कित्येक वर्षे अविरतपणे करत आहे.
advertisement
ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, तेव्हा गागाभट्ट यांनी विविध ठिकाणाहून आणलेल्या पवित्र जलाचा अभिषेक राजांवर केला होता. त्याच पार्श्वभूमीवर दरवर्षी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती व 'दुर्गराज रायगड' मार्फत दरवर्षी किल्ले रायगडावर भव्यदिव्य पार पडणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी पवित्र जलाचा अभिषेक करण्याची संकल्पना कोल्हापूर हायकर्स या संस्थेने छत्रपती संभाजीराजांपुढे मांडली होती. तसेच ते पवित्र जल दरवर्षी संकलित करण्याची जबाबदारी उचलण्याची हमी देखील दिली होती. त्यामुळे 2012 सालापासून दरवर्षी संस्थेच्या सदस्यांकडून विविध ठिकाणांवरील पवित्र जलाचे संकलन केले जाते. हेच जल किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी वापरले जाते, असे कोल्हापूर हायकर्स संस्थेचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले आहे.
advertisement
या ठिकाणांवरुन संकलित केले जाते हे जल
दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या सात ठिकाणाहून पवित्र जल संकलित केले जाते. गेल्या 12 वर्षांमध्ये आतापर्यंत सह्याद्रीतील अनेक गडकोट, हिमालयातील हिमशिखरे, देशभरातील पवित्र नद्या अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केलेल्या तामिळनाडूपासून ते उत्तरेपर्यंत विविध ठिकाणाहून हे पवित्र चल संकलित करण्यात आले आहे.
advertisement
कसे संकलित केले जाते हे जल
कोल्हापूर हॅकर्सही संस्था विविध ठिकाणी ट्रेकिंग आयोजित करत असते. संस्थेचे सदस्य दरवर्षी विविध ठिकाणी भेटी देत असतात. दरम्यान ही पवित्र जलसंकलनाचे मोहीम पार पाडण्यासाठी कोल्हापूर हायकरची टीम साधारण मे महिन्यातच रवाना होत असते. प्रत्येक टीमकडे असणाऱ्या कलश यामध्ये त्या पवित्र ठिकाणावरील चल संकलित करून आणले जाते, अशी माहिती देखील सागर यांनी दिली आहे.
advertisement
कोणत्या ठिकाणांवरुन आणले यंदाचे जल
advertisement
यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे 350 वर्ष आहे. त्यामुळे या सोहळ्याला दरवर्षीपेक्षा अधिक विशेष महत्त्व देखील आहे. त्यानुसार यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला जिंकलेल्या तोरणा किल्ल्यापासून ते दक्षिणेतील जिंजी किल्ला पर्यंतच्या विविध ठिकाणांचा समावेश आहे.
1) जिंजी (तामिळनाडू) :- राजगड, रायगड या किल्ल्यांनंतर स्वराज्याची तिसरी राजधानी तामिळनाडुतील जिंजी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहीमेत इ.स. 1677 मध्ये जिंजी किल्ला जिंकून घेतला होता.
advertisement
2) तोरणा (महाराष्ट्र) :- तोरणा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला जिंकलेला किल्ला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 व्या वर्षी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते, म्हणूनच किल्ल्याला तोरणा असे नाव दिले गेले.
3) भुदरगड (महाराष्ट्र) :- वाहतुकीवर आणि लष्करी हालचालीवर नजर ठेवण्यासाठी एका बळकट ठाण्याची नितांत आवश्यकता होती. यासाठीच एका सपाट पठारावर भुदरगड दुर्गाची निर्मिती केली.
4) रांगणा (महाराष्ट्र) :- “येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल” या एकाच ऐतिहासिक उल्लेखात या किल्ल्याचे महत्व स्पष्ट होते. छत्रपती शिवरायांना सर्वच किल्ले प्रिय होते. पण रांगणा हा त्यांचा अत्यंत आवडत्या किल्ल्यांपैकी एक होता. शिवरायांचा सहवास लाभलेल्या या गडाच्या डागडुजीसाठी इतिहासकाळात सहा हजार होन खर्च केल्याची नोंद आढळते.
छत्रपती शिवाजी महाराजांना देणार हटके मानवंदना, शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कोल्हापूरची धावपटू 300 किलोमीटर धावणार
5) मौनी महाराज समाधी स्थळ (महाराष्ट्र) :- छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहीमेत जाण्यापूर्वी महाराजांनी मौनी महाराजांचा आशीर्वाद घेतला होता.
6) केदारनाथ (उत्तराखंड) :- केदारनाथ बारा जोतिर्लिंगपैकी एक आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजही शंकराचे मोठे भक्त होते. त्यामुळे मंदाकिनी नदीचे जल आणण्यात आले आहे
7) सरस्वती नदी (माना उत्तराखंड) :- सरस्वती नदीला ज्ञान आणि विद्या देवीच प्रतिक मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी राज्यकारभारात ज्ञान आणि विद्या महत्त्वाची मानली. अनेकदा महाराज सरस्वती नदीच्या तीरावरील मंदिरांना भेटी देत आणि पूजा करत.
या सात ठिकाणांवरील पवित्र जल यावर्षीच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी संकलित करण्यात आले आहे.
दरम्यान कोल्हापूर हायकर्स फाऊंडेशनला कायमस्वरूपी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या जलाभिषेकासाठीच्या पवित्र जल संकलनाची जबाबदारी दिली आहेत. ही जबाबदारी दरवर्षी पूर्ण करण्यासाठी ही संस्था कटिबद्धता दाखवत आली आहे. तर यापुढेही ही जलसंकलनाची मोहीम दरवर्षी अखंडितपणे सुरू राहील, असेही सागर पाटील यांनी सांगितले आहे.
Location :
First Published :
June 04, 2024 3:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Shiv Rajyabhishek 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी जलाभिषेकासाठी कसे संकलित केले जाते पवित्र जल? पाहा Video