advertisement

'बायको मुलांपेक्षा तुम्ही मला जास्त आवडता...', कोपरगावच्या माजी सरपंचाचा 'काळा' चेहरा समोर; ग्रामसेविकेला करायचा नको ते मेसेज

Last Updated:

काही टेन्शन आहे का?, मी येऊ का तुमचं टेन्शन दूर करायला? असे मेसेज सरपंच ग्रामसेविकेला पाठवत असे.

News18
News18
अहिल्यानगर : कोपरगाव तालुक्यातील एका गावात माजी सरपंचाने ग्रामपंचायतीत काम करत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने याप्रकरणी 14 फेब्रुवारी रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून माजी सरपंच अशोक विठ्ठल भोकरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माजी सरपंच अशोक भोकरे हे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून वारंवार फोन करून अश्लील, लज्जास्पद आणि मानसिक त्रास देणारे मेसेज होते. “तुम्ही आज खूप छान दिसताय”, “तुमची साडी खूप सुंदर आहे”, “कधी कधी तुमचा चेहरा खूप सुकलेला दिसतो,  काही टेन्शन आहे का?”, “मी येऊ का तुमचं टेन्शन दूर करायला?” असे मेसेज पाठवत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला.
advertisement

बायका-मुलांपेक्षा तुम्ही मला जास्त आवडता...

एखाद्या महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे माजी सरपंच संवाद साधत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. तसेच, तुम्ही मला खूप आवडता, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. माझ्या बायका-मुलांपेक्षा तुम्ही मला जास्त आवडता,” असे म्हणत हात धरून बसण्याचा आग्रह करत शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास वाढत गेला आणि अखेर धैर्य एकवटून तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचे समजते.
advertisement

अद्याप आरोपीला अटक नाही,  प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न 

या तक्रारीच्या आधारे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात माजी सरपंच अशोक भोकरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानातील विनयभंगासंबंधीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचा आंदोलनाचा पवित्रा

दरम्यान, आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मंगळवारी संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन देत दोन दिवसांत आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
advertisement

महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

या घटनेमुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, महिलांनी निर्भयपणे काम करता यावे यासाठी कठोर कारवाईची गरज व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, लवकरच आरोपीविरोधात कठोर पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'बायको मुलांपेक्षा तुम्ही मला जास्त आवडता...', कोपरगावच्या माजी सरपंचाचा 'काळा' चेहरा समोर; ग्रामसेविकेला करायचा नको ते मेसेज
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement