Amit Deshmukh : 'लातूरचा नवरदेव मुंबईत, तर निलंग्याचा नवरदेव...', अमित देशमुखांनी निलंगेकरांना डिवचलं

Last Updated:

लातूर जिल्ह्यात देशमुख आणि निलंगेकर हे पारंपरिक राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. आता निलंगा विधानसभा मतदार संघावरून या दोघांमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

अमित देशमुखांनी संभाजी पाटील निलंगेकरांना डिवचलं
अमित देशमुखांनी संभाजी पाटील निलंगेकरांना डिवचलं
सचिन सोळुंके, प्रतिनिधी
लातूर, 12 ऑगस्ट : लातूर जिल्ह्यात देशमुख आणि निलंगेकर हे पारंपरिक राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. आता निलंगा विधानसभा मतदार संघावरून या दोघांमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेस आमदार यांनी निलंग्यात जाऊन संभाजी पाटील निलंगेकरांना डिवचलंय. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोण कुणाचा बँड वाजवणार याविषयी जिल्ह्यात चर्चा रंगलीय.
विधानसभा निवडणुकीला अद्याप वर्ष- दीड वर्षांचा कालावधी बाकी असला तरी लातूर जिल्ह्यात आतापासून राजकीय रणधुमाळी सुरु झाली आहे. काँग्रेस आणि भाजपात हा राजकीय सामना रंगण्याची चिन्ह आहेत. काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी निलंग्याचे भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांवर उपरोधीक टीका केलीय.
advertisement
'अक्षता तयार, स्वयपाक तयार. नवरदेव कोण? लातूरचा नवरदेव मुंबईमध्ये ठरतो. निलंग्याचा नवरदेव दिल्लीत ठरतो', असा टोला अमित देशमुख यांनी लगावला.
अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर हे पारंपरीक विरोधक म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. नुकतेच अमित देशमुखांनी संभाजी पाटील निलंगेकरांच्या निलंग्यात धोंडे जेवण कार्यक्रमाला हजेरी लावली. तसेच त्यांनी आगामी निवडणुकीसाठी निलंगेकरांना थेट आव्हान दिलंय. तर निलंगेकर समर्थकांनीही अमित देशमुखांवर बोचरी टीका केलीय.
advertisement
खरं तर संभाजी निलंगेकरांनी निलंगा विधानसभा मतदार संघावर आपली पकड मजबूत केली आहे. या मतदारसंघातून त्यांनी सगल तीन वेळा विजय मिळवला आहे. मात्र आगामी निवडणुकीत त्यांना पराभूत करण्यासाठी अमित देशमुखांनी जुळवाजुळ सुरु केली आहे, त्यामुळे आगामी काळात लातूर जिल्ह्यातीली राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amit Deshmukh : 'लातूरचा नवरदेव मुंबईत, तर निलंग्याचा नवरदेव...', अमित देशमुखांनी निलंगेकरांना डिवचलं
Next Article
advertisement
Dry Day In Maharashtra: तीन दिवस तळीरामांचा घसा कोरडा राहणार, आजपासून ड्राय डे, कारण काय?
तीन दिवस तळीरामांचा घसा कोरडा राहणार, आजपासून ड्राय डे, कारण काय?
  • आजपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या 'मधुशाला' बंद राहणार आहेत.

  • पुढील तीन दिवस तळीरामांचे हाल होणार असून ड्राय डे असणार आहे.

  • राज्य उत्पादन शुल्क विभागाने महसूल विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला आह

View All
advertisement