Numerology: प्रेम कहाणी अधुरी राहिली तरी बेहत्तर! कुटुंबाच्या प्रतिष्ठेला महत्त्व देतात या मूलांकाच्या मुली
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology Marathi: वैदिक ज्योतिषाप्रमाणेच अंकशास्त्रही खूप महत्त्वाचे मानले जाते. माणसाच्या जन्मतारखेवरून त्याच्या स्वभावाबद्दल आणि नशिबाबद्दल अनेक गोष्टी कळू शकतात. कोणाच्याही जन्मतारखेवरून एक मूलांक संख्या काढली जाते, साधारणपणे तीन ते चार जन्मतारखा एका मूलांकामध्ये येतात. अंकशास्त्रातील मूलांक 1 ते 9 पैकी मूलांक 2 आणि 7 बद्दल आपण काही रंजक माहिती जाणून घेणार आहोत, या मूलांकाची प्रेम कहाणी सहसा अधुरी राहते, पण त्या पतीसाठी खूप भाग्यवान ठरतात.
advertisement
मूलांक 2 च्या मुली प्रेमाच्या बाबतीत खूप हळव्या असतात, पण त्यांना आपल्या मनातील गोष्टी उघडपणे सांगण्यात फार संकोच वाटतो. अनेकदा स्वतःचा स्वाभिमान आणि कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्या आपल्या प्रेमाचा त्याग करतात, त्यामुळे त्यांची प्रेम कहाणी अपूर्ण राहण्याची शक्यता असते. मात्र, लग्नानंतर त्या आपल्या पतीसाठी आणि सासरच्या लोकांसाठी खूप लकी ठरतात. पतीची काळजी घेण्यात आणि संसाराचा गाडा समर्थपणे ओढण्यात त्या आघाडीवर असतात.
advertisement
मूलांक 7 - ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 7 मानला जातो. या मूलांकाच्या व्यक्तींच्या बाबतीतही असे दिसून येते की त्यांना सहजासहजी सच्चे प्रेम मिळत नाही. अनेकदा त्यांच्या आयुष्यात प्रेमाची उणीवच जाणवते किंवा त्यांचे प्रेमप्रकरण अर्धवट राहते. मात्र, या व्यक्ती त्यानंतर विचारांनी खूप प्रगल्भ बनतात.
advertisement
advertisement
मूलांक 2 असलेल्या व्यक्तींचा स्वामी चंद्र असल्यामुळे त्यांच्यात उपजतच संवेदनशीलता असते. या व्यक्ती कला आणि लेखन क्षेत्रात जसे की चित्रकला, संगीत किंवा कविता लेखनात खूप नाव कमावू शकतात. सेवाभावी स्वभाव असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात नर्स किंवा समुपदेशक म्हणून त्या उत्तम काम करतात. याशिवाय डेअरी प्रॉडक्ट्स, हॉटेल व्यवसाय किंवा पाण्याशी संबंधित व्यापार त्यांना खूप फायदेशीर ठरतात. शिक्षण क्षेत्रातही शिक्षिका म्हणून त्या यशस्वी होतात.
advertisement
मूलांक 7 असलेल्या व्यक्तींचा स्वामी केतू असल्याने त्यांना संशोधनाची आणि अध्यात्माची विशेष आवड असते. या व्यक्ती वैज्ञानिक किंवा रिसर्च फेलो म्हणून मोठे यश मिळवू शकतात. अध्यात्म, योग आणि ज्योतिष यांसारख्या विषयांत त्यांना चांगली प्रसिद्धी मिळते. तंत्रज्ञान क्षेत्रात डेटा ॲनालिसिस किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये त्यांची प्रगती वेगाने होते. तसेच गुप्तचर संस्था किंवा तपास कामांमध्ये त्यांचे डोकंचांगलं चालतं.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)







