Pune Crime: पुण्यातील आजोबा आणि महिलेचा धक्कादायक प्रताप, खिसे तपासताच पोलिसांनी लावला डोक्याला हात
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पोलिसांनी संशयावरून ताराचंद मलकेकर (वय ६७, रा. भाटनगर, पिंपरी) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे..
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने एका ज्येष्ठ नागरिकाला अटक केली आहे. पिंपरीतील भाटनगर परिसरात विक्रीसाठी बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याप्रकरणी ६७ वर्षीय वृद्धासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी कारवाई कशी झाली?
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला सोमवारी (१२ जानेवारी) दुपारी एक महत्त्वाची माहिती मिळाली. पिंपरीतील भाटनगर परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने दुपारी साडेबाराच्या सुमारास परिसरात सापळा रचला.
advertisement
पोलिसांनी संशयावरून ताराचंद मलकेकर (वय ६७, रा. भाटनगर, पिंपरी) याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला १०० ग्रॅम गांजा सापडला, ज्याची बाजारपेठेत किंमत सुमारे पाच हजार रुपये आहे. या तपासात एका महिलेचाही सहभाग निष्पन्न झाल्याने तिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी अमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. हा गांजा त्यांनी कोठून आणला होता आणि ते शहरात कोणाला विक्री करणार होते, याचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाचा अशा अवैध व्यवसायात सहभाग आढळल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 11:27 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: पुण्यातील आजोबा आणि महिलेचा धक्कादायक प्रताप, खिसे तपासताच पोलिसांनी लावला डोक्याला हात










