Latur Crime : नायगाव बार मालक हत्या प्रकरणात ट्विस्ट, CCTV मधून धक्कादायक गोष्टी उघड, शुक्रवारी रात्री 11:30 ला काय घडलं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Latur Bar owner Murder Case : नायगाव येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री 11:30 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. गजानन नामदेव कासले असे या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
Latur Crime News : लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातून एक अशी घटना समोर (Latur Bar owner Murder Case) आली आहे, ज्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलल्याने एका कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळलाय. अज्ञात तीन व्यक्तींनी बारमध्ये येऊन दारू सिगारेट दे, म्हणत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देत जीवे मारण्याच्या हेतूने मारहाण केल्याचं समोर आलं आहे.
तिघं जण बारमध्ये आले अन्...
नायगाव येथील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री 11:30 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. गजानन नामदेव कासले (वय 42) असे या दुर्घटनेत जीव गमावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तिघं जण बारमध्ये आले होते आणि त्यांनी काही वस्तूंची मागणी केली. मात्र, ती मागणी पूर्ण न झाल्याने त्यांच्यात आणि मालकामध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादाचे रूपांतर पुढे एका हिंसक हल्ल्यात झाले, ज्यामध्ये बार मालक कासले यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
वेटरला जबर मारहाण...
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी गजानन कासले यांच्या डोक्यात लाठ्या-काठ्यांनी निर्दयीपणे प्रहार केले गेले होते. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेला वेटर अजय मोरे हा देखील गंभीर जखमी झाला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी दुकानातील 10 ते 15 हजार रुपये रोख आणि दारूच्या बाटल्या घेऊन तेथून पळ काढला. या थरारक घटनेचे दृश्य सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाले आहे.
advertisement
अवघ्या 5 तासांत आरोपींना अटक
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 5 तासांत लोहा तालुक्यातून मारोती उर्फ बबलु बोयणे, सागर बोयणे आणि संतोष तेलंगे या तिघांना ताब्यात घेतले. बालाजी कासले यांच्या तक्रारीवरून या आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
view commentsLocation :
Latur,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 7:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur Crime : नायगाव बार मालक हत्या प्रकरणात ट्विस्ट, CCTV मधून धक्कादायक गोष्टी उघड, शुक्रवारी रात्री 11:30 ला काय घडलं?







