Latur Crime : आई नव्हे 'कसाई', रागाच्या भरात पोटच्या चिमुकलीवर 17 वेळा सपासप वार, तोंडात चाकू खुपसला; लातूर हादरलं!

Last Updated:

Latur Crime Mother Stabbed Daughter : पोलिसांनी तिची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी तिला तब्बल 30 तास मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवले होते. मात्र, वैद्यकीय चाचण्यांनंतर ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे 'फिट' असल्याचा अहवाल समोर आला आहे.

News18
News18
Latur Crime News : लातूरच्या श्यामनगर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पती घरी परतण्यास उशीर झाला या एका क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात एका आईने आपल्या दीड वर्षाच्या (18 महिन्याच्या) चिमुरडीची निर्घृण हत्या केली. ज्या आईच्या कुशीत बाळ स्वतःला सर्वात सुरक्षित समजते, त्याच आईने 'नंदिनी' नावाच्या आपल्या पोटच्या गोळ्यावर चाकूने सपासप वार करून तिला कायमचं शांत केलं.

मानसिकदृष्ट्या पूर्णपणे 'फिट'

या घटनेतील आरोपी माता अश्विनी हिला पोलिसांनी अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले होते. पोलिसांनी तिची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी तिला तब्बल 30 तास मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवले होते. मात्र, वैद्यकीय चाचण्यांनंतर ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे 'फिट' असल्याचा अहवाल समोर आला आहे. कोणत्याही मानसिक आजारामुळे नव्हे, तर केवळ रागाच्या भरात तिने हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाल्याने तिला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
advertisement

रागाचा भस्मासुर संचारला अन्....

मूळचे हासेगाव येथील असलेले हे चौगुले कुटुंब पोटाची खळगी भरण्यासाठी लातुरात आले होते. वडील विक्रम हे उसाच्या ट्रॅक्टरवर रात्रभर कष्ट करत होते, तर 19 जानेवारीच्या सकाळी घरात रागाचा भस्मासुर संचारला होता. अश्विनीने आपल्या दीड वर्षाच्या लेकीवर एक-दोन नव्हे तर तब्बल 17 वार केले. इतकंच नाही तर या निष्ठूर मातेने चिमुरडीच्या तोंडातही चाकू खुपसले, ज्यामुळे त्या कोवळ्या जीवाचा जागीच तडफडून अंत झाला.
advertisement

विक्रम जेव्हा घरी पोहोचले तेव्हा...

या थरकाप उडवणाऱ्या घटनेचा सर्वात भयंकर भाग म्हणजे अश्विनीचा 4 वर्षांचा मुलगा राजवीर याने हे सर्व आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले. आपल्या सख्ख्या लहान बहिणीला आई मारत असल्याचे पाहून त्या बालमनावर न भरून निघणारी जखम झाली आहे. विक्रम जेव्हा घरी पोहोचले तेव्हा घराचा उंबरठा रक्ताने माखलेला होता आणि काळजाचा तुकडा निर्जीव पडलेला होता. या घटनेने संपूर्ण लातूर जिल्हा सुन्न झाला असून समाजात संतापाची लाट आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur Crime : आई नव्हे 'कसाई', रागाच्या भरात पोटच्या चिमुकलीवर 17 वेळा सपासप वार, तोंडात चाकू खुपसला; लातूर हादरलं!
Next Article
advertisement
BMC Mayor Eknath Shinde:  न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबईच्या महापौरपदाचा सस्पेन्स वाढला!
न सांगता, न कळवता शिंदेंनी गाठली दिल्ली! भाजप नेत्यांसोबतच्या गुप्त भेटीने मुंबई
  • भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सत्ता वाटपावरून चढाओढ सुरू असल्याचे चित्र

  • मुंबईच्या महापौराबाबतचा निर्णय दिल्लीतून होणार असल्याने घडामोडींना वेग

  • शिंदे गट-भाजपच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोड घडली आहे.

View All
advertisement