महाराष्ट्र शासनाची मोहिम, राज्यात सुरू आहे गंभीर रोगावर सर्वेक्षण; लक्षण काय?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
महाराष्ट्र शासनाने 2027 पर्यंत राज्यात शून्य कुष्ठरुग्ण ठेवण्याचे उद्दिष्ट घेतले आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारपासून दि. 17 कुष्ठरोग सर्वेक्षण सुरू झाले असून, हे सर्वेक्षण 2 डिसेंबरपर्यंत चालेल.
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र शासनाने 2027 पर्यंत राज्यात शून्य कुष्ठरुग्ण ठेवण्याचे उद्दिष्ट घेतले आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवारपासून दि. 17 कुष्ठरोग सर्वेक्षण सुरू झाले असून, हे सर्वेक्षण 2 डिसेंबरपर्यंत चालेल. शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी शहरी आणि ग्रामीण भागामध्ये देखील मोहीम राबवली जात आहे अशी माहिती सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. शिवकुमार हालकुडे यांनी दिली आहे.
या सर्वेक्षण अंतर्गत संभाजीनगर जिल्ह्यातील शहरी भागात आणि ग्रामीण भागात तपासणी केली जात आहे. या सर्वेक्षणात नागरिकांची संपूर्ण तपासणी आशा सेविका करणार आहेत. कुष्ठरोगाचे जे लक्षण आहे यामध्ये कानाच्या पाळ्या जाड होणे, शरीरावरती गाठी येणे, चेहरा लालसर होणे, त्यासोबत हाता- पायांना मुंग्या येणे, हाता पायाला जखमा होणे, हात मनगटातून लुळा पडणे, पाय देखील लुळा पडणे, हातापायांना बधिरता येणे. डोळा बंद न होणे यांसह अनेक लक्षणे कुष्ठरोगाचे आहेत.
advertisement
जर तुम्हाला सुद्धा वर नमुद केल्याप्रमाणे काही लक्षणे दिसत असतील तर आपल्या घरी जे अशा सेविका त्यासोबतचे पुरुष स्वयंसेवक येणार आहेत त्यांना सांगावे. जर आपल्याला सांगितलं की तुम्ही जवळचा डॉक्टरांकडे जाऊन दाखवा, तर तुम्ही त्वरित जाऊन दाखवावं. आपल्याकडे जर कोणाला ही लक्षण आढळली तर आपण त्वरित आशा सेविकांना आणि पुरुष स्वयंसेवकांना सांगावे. जेणेकरून ते आपल्याला याकरिता गोळी देऊ शकतील. त्यानंतर योग्य ती तपासणी करून घ्यावी आणि मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी डॉक्टरांना सहकार्य करावे. जेणेकरून आपण कुष्ठरोग हा पूर्णपणे नष्ट करू असं डॉक्टर शिवकुमार हालकुडे म्हणाले आहेत.
Location :
Maharashtra
First Published :
Nov 22, 2025 4:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्र शासनाची मोहिम, राज्यात सुरू आहे गंभीर रोगावर सर्वेक्षण; लक्षण काय?

title=जिल्ह्यात राबवली जात आहे कुष्ठरोग मोहीम 







