Krushi Market Today: मक्याचे दर खाली घसरले, सोयाबीनसह इतर शेतीमालांचे दर किती?

Last Updated:

सोमवार, दिनांक 20 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, मका व केळीची आवक आणि भाव पाहू.

+
Krushi

मक्याचे दर गडगडले: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 2 हजार 085 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 1 हजार 500 क्विंटल मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1000 ते जास्तीत जास्त 1900 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 क्विंटल लाल मक्यास 2500 ते 2700 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
केळीची आवक कमी: राज्याच्या मार्केटमध्ये 148 क्विंटल केळीची एकूण आवक झाली. यापैकी 96 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1250 ते जास्तीत जास्त 4150 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 52 क्विंटल केळीस प्रतीनुसार 450 ते 550 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीन उत्पादकांची कोंडी: राज्याच्या मार्केटमध्ये 6 हजार 771 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये सर्वाधिक 3 हजार 489 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3800 ते 4302 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 30 क्विंटल सोयाबीनला 4100 रुपये सर्वसाधारण बाजार भाव मिळाला. चंद्रपूर मार्केटमध्ये 658 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 3213 रुपये सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Krushi Market Today: मक्याचे दर खाली घसरले, सोयाबीनसह इतर शेतीमालांचे दर किती?
Next Article
advertisement
Mumbai Mayor Reservation: अ, आ, इ, ई... आणि मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी प्रवर्ग बाहेर पडण्याचं खरं कारण
अ, आ, इ, ई... अन् मुंबईचा गेम झाला! महापौर पदाच्या शर्यतीतून ओबीसी बाहेर का?
  • मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

  • महापौर आरक्षण सोडतीवर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता.

  • ओबीसींसाठी मुंबईचं महापौर पदाचं आरक्षण का लागू झालं नाही, असा प्रश्न उपस्थित करण

View All
advertisement