Targhar Railway Station: नवी मुंबईत उभं राहिलं सर्वात अत्याधुनिक लोकल स्टेशन, विमानतळाला मिळणार कनेक्टिव्हिटी

Last Updated:

Targhar Railway Station: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Targhar Railway Station: नवी मुंबईत उभं राहिलं सर्वात अत्याधुनिक लोकल स्टेशन, विमानतळाला मिळणार कनेक्टिव्हिटी
Targhar Railway Station: नवी मुंबईत उभं राहिलं सर्वात अत्याधुनिक लोकल स्टेशन, विमानतळाला मिळणार कनेक्टिव्हिटी
नवी मुंबई: बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या विमानतळाचं उद्घाटन देखील होणार असून येथून उड्डाणांना सुरुवात होईल. या विमानतळाला सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी देण्याचे प्रयत्न सुरू आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी सध्या विमानतळाजवळ तारघर येथे अत्याधुनिक उपनगरीय रेल्वे स्टेशन तयार करण्यात आलं आहे. हे स्टेशन लवकरच प्रवाशांसाठी खुलं होणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या रेल्वे स्टेशनमध्ये टेरेस पार्किंग, शटल सेवा स्टेशन, व्यापारी गाळे यासह तीन प्लॅटफॉर्म असणार आहेत. एक अत्याधुनिक रेल्वे स्टेशन म्हणून याचा विकास करण्यात आला आहे. त्यामुळे हे स्टेशन लोकल सेवेतील एक महत्त्वाचं लँडमार्क ठरणार आहे.
नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर या रेल्वे स्टेशनवर लोकलला थांबा दिला जाणार आहे. 112 कोटी रुपये खर्च करून सीआयडी कोचची उभारणी करण्यात आली आहे. 270 मीटर लांब आणि 13 मीटर रुंदीचे तीन प्लॅट फॉर्म बांधण्यात आले आहेत. प्रवाशांसाठी पार्किंग व्यवस्था आहे. बस, कार, ऑटो यांचा स्वतंत्र ड्रॉप झोन आहे. त्यामुळे सर्व रेल्वे स्टेशन्सपैकी हे स्टेशन सर्वच बाबतीत सरस असणार आहे. स्टेशनचं एकूण क्षेत्रफळ 16, 600 चौरस मीटर आहे.
advertisement
रेल्वे स्टेशनचा पहिला टप्पा रेल्वेच्या सोयींवर आधारित आहे. पुढील टप्प्यात विमानतळ सुरू झाल्यानंतर टाऊनशिप वाढवल्यानंतर रिटेल आणि लेझर झोन तयार होईल. विमातळाकडे तोंड असलेली बाजू शटल बस सेवेसाठी वापरली जाणार आहे. या स्टेशनमध्ये कोअर एरिया, ट्रान्झिशन एरिया, पेरीफेरल एरिया आणि प्रशासकीय कार्यालयांची जागा अशा चार विभाग असणार आहेत. याशिवाय, सुलभ स्वच्छतागृहे, सब वे द्वारे सर्व भाग जोडला जाईल. ही पे अँड पार्क स्वरुपात पार्किंग सुविधाही उपलब्ध असणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Targhar Railway Station: नवी मुंबईत उभं राहिलं सर्वात अत्याधुनिक लोकल स्टेशन, विमानतळाला मिळणार कनेक्टिव्हिटी
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement