Maharashtra Exit Poll Result : महाराष्ट्रात भाजपचं सर्वांचा 'दादा', काँग्रेस, उद्धव ठाकरे दुसऱ्या नंबरवर, शिंदे पडले मागे

Last Updated:

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे यायला सुरूवात झाली आहे. भारतातलं सर्वांत मोठं न्यूज नेटवर्क असलेलं न्यूज18 नेटवर्कनं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व्हे घेऊन येतोय.

महाराष्ट्रात भाजपचं सर्वांचा 'दादा', काँग्रेस, उद्धव ठाकरे दुसऱ्या नंबरवर, शिंदे पडले मागे
महाराष्ट्रात भाजपचं सर्वांचा 'दादा', काँग्रेस, उद्धव ठाकरे दुसऱ्या नंबरवर, शिंदे पडले मागे
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे यायला सुरूवात झाली आहे. भारतातलं सर्वांत मोठं न्यूज नेटवर्क असलेलं न्यूज18 नेटवर्कनं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व्हे घेऊन येतोय. आमचा हा EXIT नाही EXACT POLL आहे. 543 जागांवर जनतेनं काय फैसला यावर पाहा न्यूज18 नेटवर्कचा मेगा एक्झिट पोल आहे. न्यूज 18 नेटवर्कच्या या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातून धक्कादायक आकडे समोर आले आहेत.
महाराष्ट्रात भाजपने 45 प्लसचा नारा दिला होता, पण भाजपच्या या नाऱ्याला धक्का बसला आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी एनडीएला 32 ते 35 जागा तर महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपला 20 ते 23 जागा मिळतील तर काँग्रेसला 6-9 जागांवर विजय मिळू शकतो. काँग्रेसला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत फक्त 1 जागा मिळाली होती, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या खासदारांची संख्या वाढू शकते.
advertisement
महाराष्ट्रामध्ये महायुतीकडून भाजपने 28 तर शिवसेनेने 15 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा लढवल्या होत्या. तर महाविकासआघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वाधिक 22 जागा लढवल्या. काँग्रेसने 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या होत्या.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Exit Poll Result : महाराष्ट्रात भाजपचं सर्वांचा 'दादा', काँग्रेस, उद्धव ठाकरे दुसऱ्या नंबरवर, शिंदे पडले मागे
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement