Loksabha Election 2024: मविआचं अंतिम जागावाटप! कोण कुठून लढवणार लोकसभा? ठाकरे गट आणि काँग्रेसची संपूर्ण यादी

Last Updated:

कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ याची यादी समोर आली आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 21, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 10, तर काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत.

महाविकासआघाडीचं जागावाटप
महाविकासआघाडीचं जागावाटप
मुंबई : महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत अंतिम यादी जाहीर केली. कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ याची यादी समोर आली आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 21, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 10, तर काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत. बरेच दिवस चर्चेत असलेल्या सांगली लोकसभेचा तिढा सुटला असून आता शिवसेना ठाकरे गटच सांगलीची जागा लढणार आहे. पाहूया कोणाला कोणत्या आणि किती जागा मिळाल्या
कोणाला किती आणि कोणत्या जागा?
शिवसेना (21) जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पूर्व(इशान्य)
राष्ट्रवादी (10) बारामती, शिरूर सातारा, भिवंडी दिंडोरी म्हाडा, रावेर, बीढ, वर्धा ,अहमदनगर दक्षिण
काँग्रेस (17) : नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई
advertisement
काँग्रेसची यादी
काँग्रेसची यादी
शिवसेनेच्या जागांची यादी
शिवसेनेच्या जागांची यादी
दरम्यान सांगली लोकसभेचा तिढा सुटला असून आता शिवसेना ठाकरे गटच सांगलीची जागा लढणार आहे. शिवसेनेची उमेदवारी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर होताच जिल्ह्यातील काँग्रेस नेते नॉट रिचेबल झाले आहेत. काँग्रेस नेते विश्वजीत कदम, विशाल पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर यानंतर शुकशुकाट आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Loksabha Election 2024: मविआचं अंतिम जागावाटप! कोण कुठून लढवणार लोकसभा? ठाकरे गट आणि काँग्रेसची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement