Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा स्वीकारला जाणार? दिल्लीतून आली मोठी अपडेट

Last Updated:

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसलेल्या धक्क्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळं करा, असं फडणवीस म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा स्वीकारला जाणार? दिल्लीतून आली मोठी अपडेट
देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा स्वीकारला जाणार? दिल्लीतून आली मोठी अपडेट
राहुल झोरी, प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बसलेल्या धक्क्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळं करा, असं फडणवीस म्हणाले होते, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती. यानंतर आता फडणवीसांच्या राजीनाम्याच्या तयारीबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर आता दिल्ली भाजपमध्ये खलबतं सुरू होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याबाबत उद्या महाराष्ट्र भाजप कोअर कमिटी दिल्लीत पक्षनेतृत्वाची भेट घेणार आहे. अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि महाराष्ट्र प्रभारी बीएल संतोष यांची महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटीसोबत दिल्लीत बैठक होणार आहे.
advertisement
या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबाबत चर्चा होणार आहे. सत्तेतून बाहेर पडल्याशिवाय संघटनेचं बळकटीकरण होणार नाही, यावर अजूनही देवेंद्र फडणवीस ठाम आहेत. आपली भूमिका पक्ष आणि संघटनात्मक बांधणीच्या फायद्याचीच आहे, हे पटवून देण्यावर देवेंद्र फडणवीस ठाम आहेत, त्यामुळे याबाबत आता उद्या दिल्लीत नेमका काय निर्णय होणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून आहे.
advertisement
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला फक्त 17 जागा जिंकता आल्या. यामध्ये भाजपने 9 तर शिवसेनेने 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 1 जागा जिंकली. दुसरीकडे महाविकासआघाडीला राज्यात 30 जागांवर यश मिळालं. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनाम्याची तयारी दर्शवली. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आपण राजीनामा देत असल्याचं फडणवीस म्हणाले होते.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा स्वीकारला जाणार? दिल्लीतून आली मोठी अपडेट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement