Devendra Fadnavis : महाराष्ट्रात 99, देशाच्या टोकाला एक, राजकीय मैदानात फडणवीसांची रेकॉर्डब्रेक बॅटिंग, चौथ्या टप्प्यातच झळकावलं शतक

Last Updated:

लोकसभा निवडणूकातील चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडेल, त्याआधी कालच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने सभांचा धडाका लावला होता, यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर होते.

महाराष्ट्रात 99, देशाच्या टोकाला एक, राजकीय मैदानात फडणवीसांची रेकॉर्डब्रेक बॅटिंग, चौथ्या टप्प्यातच झळकावलं शतक
महाराष्ट्रात 99, देशाच्या टोकाला एक, राजकीय मैदानात फडणवीसांची रेकॉर्डब्रेक बॅटिंग, चौथ्या टप्प्यातच झळकावलं शतक
राहुल झोरी, प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणूकातील चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या पार पडेल, त्याआधी कालच प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने सभांचा धडाका लावला होता, यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर होते. त्यांच्या सभेलाही मोठी मागणी होती. पहिल्या टप्प्याची घोषणा होताच फडणवीसांनी दौरा घोषित केला. यात फडणवीस 125 हून अधिक सभा राज्यात घेणार असल्याचं बोललं गेलं. आता चौथा टप्पा पार पडत असताना फडणवीसांनी सभांचं शतक झळकवलं आहे. पाचवा टप्पा अजून बाकी आहे. फडणवीसांच्या रेकॉर्ड ब्रेक सभा भाजपसाठी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राजकीय ताकद वाढल्याचं यातून दिसून येतं, असं मत भाजप समर्थक व्यक्त करत आहेत. मोदी, शहा आणि योगींप्रमाणे फडणवीसांची लोकप्रियता वाढत असल्याचं भाजप कार्यकर्त्याचं म्हणणं आहे.
advertisement
महाराष्ट्रात 99 तर केरळात 1
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 100 सभांचा आकडा पूर्ण केला आहे, असं करणारे ते राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकमेव नेते आहेत. फडणवीसांनी महाराष्ट्रातच नव्हे तर केरळमध्ये ही एक सभा घेतली आहे. राज्यात 99 आणि केरळात 1 अशा 100 सभा त्यांनी घेतल्यात. भाजपने 400 पार जाण्याचा नारा दिला आहे. हे करताना घटक पक्षांच्या उमदेवारांची विजय निश्चिती महत्त्वाची आहे. यासाठी मोदी, शहांप्रमाणे फडणवीसांच्या सभेची ही मागणी वाढली होती. राज्यात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत, यात फडणवीसांनी 130 हून अधिक सभा घेण्याचं नियोजन आखलं आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील तालुक्याच्या ठिकाणी या या सभा होणार आहेत. आकडेवारी पाहिली तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरासरी 3 सभा फडणवीस घेत आहेत. सभांचा हा वाढता आकडा फडणवीस म्हणजेच विजय निश्चिती असं समीकरण प्रस्थापित करत असल्याचं बोललं जातं.
advertisement
पुण्यात शतक
फडणवीसांनी आपली 100 वी सभा पुण्यात घेतली. पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ हे भाजपचे उमेदवार आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसने ही जागा महाविकास आघाडीतून मिळवली. कसब्याचे आमदार रविंद्र धनगेकर खासदारकीची निवडणूक लढत आहेत. भाजपसाठी ही निवडणूक अडचणीची ठरावी, यासाठी पवार आणि ठाकरेंनी पुर्ण ताकद लावली आहे. अशात फडणवीसांची सभा इथं गेमचेंजर असल्याचं सांगण्यात येतंय. पुण्याची जागा फडणवीसांनी गांभीर्यानं घेतल्याचं बोललं जातंय. पुण्यात फडणवीसांनी प्रचाराची सांगता केली. शिवाय पुण्यातच फडणवीसांचा मुक्काम असणार आहे. 13 मे ला राज्यातील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.
advertisement
लोकप्रियता वाढली
फडणवीसांनी 100 सभा घेतल्या आहेत. भाजपसह महायुतीतील शिंदे गट व पवार गटासाठीही फडणवीसांनी सभा घेतल्या. फडणवीसांच्या सोशल इंजिनिअरिंगमुळे हा आकडा वाढल्याचं बोललं जातंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो की ओबीसी आरक्षणाचा, फडणवीसांनी यातून मध्यमार्ग काढला. दोन्ही समाजाचा असंतोष सामंज्यस्यात बदलला. पुढं मायक्रो ओबीसी समाजांना महामंडळं दिली. अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर असं केलं. दिव्यांग बांधवांसाठी विशेष तरतुदी केल्या. दलित आणि आदिवासी प्रश्नांनाही फैलावर घेतले. त्यातूनही योग्य मार्ग काढले. फडणवीसांचं हेच सोशल इंजिनिअरिंग आता फळाला आल्याचं चित्रं आहे. राज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याच प्रयत्न फडणवीसांनी केला होता. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सर्वच वर्गांमध्ये फडणवीसांबद्दलची सरकारात्मक भावना तयार झालीये, असं मत भाजप कार्यकर्ते व्यक्त करतायेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Devendra Fadnavis : महाराष्ट्रात 99, देशाच्या टोकाला एक, राजकीय मैदानात फडणवीसांची रेकॉर्डब्रेक बॅटिंग, चौथ्या टप्प्यातच झळकावलं शतक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement