Nanded Loksabha : कुऱ्हाडीने EVM फोडलं; नांदेडमधल्या मतदानाला धक्कादायक वळण, युवक ताब्यात

Last Updated:

देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघांचाही समावेश आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत शांततेत मतदान सुरू असलं तरी नांदेडमध्ये याला गालबोट लागलं आहे.

कुऱ्हाडीने EVM फोडलं; नांदेडमधल्या मतदानाला धक्कादायक वळण, युवक ताब्यात
कुऱ्हाडीने EVM फोडलं; नांदेडमधल्या मतदानाला धक्कादायक वळण, युवक ताब्यात
मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड : देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघांचाही समावेश आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत शांततेत मतदान सुरू असलं तरी नांदेडमध्ये याला गालबोट लागलं आहे. नांदेडमधल्या एका मतदान केंद्रावर युवकाने ईव्हीएम मशीन फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदानकेंद्रावर ही घटना घडली आहे.
भय्यासाहेब एडके असं कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडणाऱ्या युवकाचं नाव आहे. मतदान केंद्रावरील पोलिसांनी भय्यासाहेब एडकेला तात्काळ ताब्यात घेतलं आहे. या युवकाने ईव्हीएम मशीन का फोडलं याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. तरुणाने फोडलेल्या या ईव्हीएम मशीनमध्ये एकूण किती मतं होती, तसंच मशीन फुटल्यानंतरही ही मतं सुरक्षित आहेत का? याचा तपास निवडणूक अधिकारी घेत आहेत. युवकाने मतदान केंद्रावर कुऱ्हाड नेली कशी? तसंच मतदान केंद्राबाहेर सुरक्षा रक्षकांकडून युवकाची तपासणी केली गेली नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
advertisement
महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 43.01 टक्के मतदान झालं आहे. नांदेडमध्ये दुपारी 3 पर्यंत 42.42 टक्के इतकं मतदान झालं. नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर यांची काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्याशी थेट लढत होत आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे चर्चेत आला. काँग्रेसकडून दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded Loksabha : कुऱ्हाडीने EVM फोडलं; नांदेडमधल्या मतदानाला धक्कादायक वळण, युवक ताब्यात
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement