Sharad Pawar : 'आधी सकाळ का संध्याकाळ बघावं लागतं', शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
- Published by:Shreyas
Last Updated:
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार साताऱ्यामध्ये आले होते. या प्रचारसभेमध्ये शरद पवारांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे.
सचिन जाधव, प्रतिनिधी
सातारा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार साताऱ्यामध्ये आले होते. या प्रचारसभेमध्ये शरद पवारांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे, तसंच शशिकांत शिंदे यांना निवडून द्यायचं आवाहनही सातारकरांना केलं आहे. जे देशाच्या हिताचं नाही, त्यांना धडा शिकवायची ताकद सातारकरांमध्ये आहे. इंग्रजांच्या काळात सातारकर घाबरले नाहीत,किरकोळ लोकांच्यासमोरसुद्धा घाबरणार नाहीत. शशिकांत शिंदे कष्टकरी कुटुंबातले आहेत. लोकसभेला दिलेला उमेदवार तुमच्या पाठिंब्यावर यशस्वी होईल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.
advertisement
उदयनराजेंना टोला
'कॉलर उडवायचं म्हणजे आधी सकाळ आहे का संध्याकाळ आहे ते बघावं लागतं, त्यांच्या विषयी जास्त बोलण्याचं कारण नाही. आम्ही गादीचा सन्मान करतो, पण मत देताना गादीला देत नाही. कष्टकऱ्यांच्या प्रतिनिधींचा सन्मान आपण करूयात', असं शरद पवार म्हणाले.
फडणवीसांवरही निशाणा
view comments‘देवेंद्र फडणवीस म्हणाले दोन पक्ष फोडून मी या ठिकाणी आलो, पक्ष उभे करायला अक्कल लागते, फोडायला अक्कल लागत नाही. चव्हाण साहेबांना भारतरत्न करण्याचं बोललं जात आहे. 10 वर्षात सुचलं नाही, निवडणूक आल्यावर सुचलं. आज कराडला आहेत, त्यांनी आजच जाहीर करून टाकावं, यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न देतो म्हणून’, असं आव्हान शरद पवारांनी केलं आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
April 29, 2024 6:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar : 'आधी सकाळ का संध्याकाळ बघावं लागतं', शरद पवारांचा उदयनराजेंना टोला


