advertisement

Ahilyanagar Madhi Yatra : भटक्यांच्या पंढरीत भेदभावाची ठिणगी! मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना पुन्हा विरोधाची भूमिका, प्रशासनाची डोकेदुखी वाढली

Last Updated:

Madhi Yatra: श्री क्षेत्र मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास ग्रामपंचायतीने पुन्हा विरोध दर्शवला असून, सरपंच संजय मरकड यांच्या भूमिकेमुळे प्रशासनासमोर तणाव रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

भटक्यांच्या पंढरीत भेदभावाची ठिणगी! मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना पुन्हा विरोधाची भूमिका, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
भटक्यांच्या पंढरीत भेदभावाची ठिणगी! मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना पुन्हा विरोधाची भूमिका, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी, अहिल्यानगर: राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि 'भटक्यांची पंढरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ यात्रेवरून पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची चिन्हं आहेत. यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं लावू देणार नाही, या आपल्या जुन्या भूमिकेवर मढी ग्रामपंचायत ठाम राहिली आहे. सरपंच संजय मरकड यांनी ही भूमिका अधिकृतपणे जाहीर केल्याने यात्रेपूर्वीच जिल्ह्यात नवा वादाला तोंड फुटले आहे.

नेमका वाद काय?

दरवर्षी रंगपंचमीच्या मुहूर्तावर मढी येथे मोठी यात्रा भरते. मात्र, गेल्या वर्षापासून या यात्रेला वादाचे ग्रहण लागले आहे. गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत व्यवसाय करण्यास मज्जाव करणारा ठराव मंजूर केला होता. या निर्णयामुळे मोठा गदारोळ झाला होता आणि हे प्रकरण अखेर न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले. न्यायालयाने यावर अद्याप कोणताही अंतिम निकाल दिलेला नसतानाही, यंदाच्या यात्रेसाठी ग्रामपंचायतीने तोच पवित्रा घेतल्याने प्रशासन पेचात पडले आहे.
advertisement

सरपंचांची आक्रमक भूमिका

सरपंच संजय मरकड यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, ग्रामपंचायत आपल्या निर्णयावर ठाम असून यंदाही मुस्लिम व्यावसायिकांना यात्रेत जागा दिली जाणार नाही. या भूमिकेमुळे धार्मिक सलोखा धोक्यात येण्याची भीती सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रशासन सतर्क, पोलिसांचे लक्ष

यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक मढीत दाखल होत असतात. अशा संवेदनशील परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सतर्क झाले आहे. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता, यात्रेच्या काळात मढीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जाण्याची शक्यता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ahilyanagar Madhi Yatra : भटक्यांच्या पंढरीत भेदभावाची ठिणगी! मढी यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना पुन्हा विरोधाची भूमिका, प्रशासनाची डोकेदुखी वाढली
Next Article
advertisement
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; 'NUDGE' Notice आली तर काय करावे, काय टाळावे
करोडो लोकांना Income टॅक्स नोटीस, करदात्यांच्या मनात धडकी; काय करावे, काय टाळावे
  • आयकर विभागाची NUDGE नोटीस

  • दुर्लक्ष केलं तर अडचण वाढणार

  • काय करावे, काय टाळावे?

View All
advertisement