TET Exam: 'टीईटी'च्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, परीक्षा केंद्राबद्दल नवी अपडेट
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेणाऱ्या येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) साठी अल्पसंख्यांक भाषेकरिता परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या या निर्णयामुळे बंगाली, कन्नड, तेलुगु आणि गुजराथी भाषिक अल्पसंख्याक उमेदवारांना सोयीचे होणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेणाऱ्या येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) साठी अल्पसंख्यांक भाषेकरिता परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या या निर्णयामुळे बंगाली, कन्नड, तेलुगु आणि गुजराथी भाषिक अल्पसंख्याक उमेदवारांना सोयीचे होणार आहे. टीईटीची परीक्षा येत्या 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेतली जाणार आहे. येत्या 10 नोव्हेंबरपासून प्रवेशपत्र उमेदवारांना मिळणार आहेत. परीक्षेसाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असताना आता विद्यार्थ्यांच्या समोर परीक्षा केंद्रासंबंधीत महत्त्वाची अपडेट आली आहे.
राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलेल्या माहितीप्रमाणे पहिली ते पाचवी इयत्तेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची परीक्षा सकाळच्या सत्रात घेतली जाणार आहे, तर सहावी ते आठवी या इयत्तेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची परीक्षा दुपारच्या सत्रात होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना मराठी, हिंदी इंग्रजीसह बंगाली, कन्नड, तेलुगु आणि गुजराती अशा भाषा निवडता येणार आहेत. परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांची संख्या एकूण 4 लाख 79 हजारांहून अधिक आहे. अल्पसंख्यांक भाषेमध्ये परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी असल्यामुळे या उमेदवारांसाठी काही जिल्ह्यांतच परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे.
advertisement
बंगाली माध्यमाच्या उमेदवारांसाठी पुणे आणि चंद्रपूर येथे परीक्षा केंद्रे असतील. मुंबई, पालघर, पुणे, धुळे, नंदूरबार आणि जालना येथील उमेदवारांना पुण्यात परीक्षा द्यावे लागणार आहे. तर नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना चंद्रपूरामध्ये केंद्र असेल. कन्नड माध्यमातून परीक्षा देणार्या मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ठाण्यामध्ये, तर पुणे, सोलापूर, हिंगोली, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सोलापूरमध्ये, तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सांगलीत परीक्षा केंद्र राहणार आहे. तेलुगू माध्यमातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी पुणे येथे, गुजराती माध्यमाच्या मुंबई, ठाणे, पालघर, पुणे येथील उमेदवारांसाठी ठाणे येथे, तर नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, बुलडाणा येथील उमेदवारांसाठी नंदूरबार येथील परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे.
advertisement
23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (TET) बंगाली, कन्नड, तेलगु आणि गुजराती माध्यमांच्या उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत. अल्पसंख्यांक उमेदवारांना विविध जिल्ह्यातील उमेदवारांसाठी पुणे, चंद्रपूर, ठाणे, सोलापूर आणि सांगलीमध्ये परीक्षा केंद्रे असतील.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 05, 2025 4:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
TET Exam: 'टीईटी'च्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, परीक्षा केंद्राबद्दल नवी अपडेट


