एक किंवा दोन विषय गेले तरी टेन्शन घेऊ नका, 11 वीत सहज मिळणार अॅडमिशन

Last Updated:

ATKT लागली तरी टेन्शन नॉट! 11 वीमध्ये सहज मिळणार अॅडमिशन, फक्त करा हे काम

News18
News18
प्रतिनिधी अभिजित पोते: दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाचे अपडेट्स दिले आहेत. दरवर्षीपेक्षा यंदाचा निकाल दीड टक्क्यांहून अधिक कमी लागला आहे. २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या.राज्यात यंदा जोरदार कॉपी मुक्त अभियान राबविण्यात आले होते. एकूण ३७ केंद्रावर घडले होते कॉपी सारखे गैरप्रकार या सर्व केंद्राचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले आहेत.
राज्यातील एकूण १५ लाख ५८ हजार २० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी एकूण १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात यंदा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. विद्यार्थी आणि पालकांना दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
advertisement
कोणत्या वेबसाईटवर निकाल पाहायचा
१. https://results.digilocker.gov.in
२. https://sscresult.mahahsscboard.in
३. http://sscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
दहावीचा निकालात ज्या विद्यार्थ्यांचे एक किंवा दोन विषय राहिले आहेत, त्यांना घाबरण्याची गरज नाही. त्यांना 11 वीसाठी प्रवेश घेता येणार आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या पुरवणी परीक्षेत राहिलेले दोन्ही विषय सोडवणं आवश्यक आहे. त्याशिवाय इयत्त बारावीसाठी ते विद्यार्थी अॅडमिशन घेऊ शकत नाहीत. एक किंवा दोन विषय गेले असतील तरी देखील विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून बोर्डानं हा निर्णय घेतला आहे.
advertisement
ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://mahahsscboard.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक १४ मे २०२५ ते बुधवार, दिनांक २८ मे २०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/ UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एक किंवा दोन विषय गेले तरी टेन्शन घेऊ नका, 11 वीत सहज मिळणार अॅडमिशन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement