नवरा बायकोच्या लढतीत बायकोची बाजी, जाधवांना पराभवाचा धक्का, दानवेंची लेक जिंकली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कन्नड विधानसभा मतदार संघात शिंदेंच्या शिवसेनेने रंजना जाधव, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडून उदयसिंह राजपूत आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यात तिरंगी लढत होती. या लढतीत थेट लढत ही जाधव नवरा बायकोमध्येच होती.
Maharashtra Assembly Election Result 2024 : कन्नड विधानसभा मतदार संघात धक्कादायक निकाल लागला आहे. या निकालात एका बायकोनेच नवऱ्याला धोबीपछाड देत विजय मिळवला आहे. भापजचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांची कन्या रंजना जाधव विजयी ठरल्या आहेत. तर त्यांचे विभक्त पती हर्षवर्धन जाधव हे 18 हजार मतांनी पराभूत झाले आहे. या निकालाची सर्वत्र चर्चा आहे.
कन्नड विधानसभा मतदार संघात शिंदेंच्या शिवसेनेने रंजना जाधव, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेकडून उदयसिंह राजपूत आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यात तिरंगी लढत होती. या लढतीत थेट लढत ही जाधव नवरा बायकोमध्येच होती.
दरम्यान एका सभेत रंजना जाधव या ढसाढसा रडल्या होत्या. माझ्या वडिलांवर वाटेल तसे आरोप झाले पण आम्ही ते सहन केले. कारण लेकीच्या बापाने ते आरोप सहन करायचे असतात, असं म्हणत विभक्त पती हर्षवर्धन जाधव यांनी कसा अन्याय केला हे रंजना जाधव यांनी सांगितलं होतं.
advertisement
निवडणुकीच्या निकालात रंजना जाधव यांना 84 हजार 492 मतं पडली होती. तर विभक्त पती हर्षवर्धन जाधव यांना 66 हजार मतं पडली होती. त्यामुळे रंजना जाधव यांनी विभक्त पती हर्षवर्धन जाधव यांचा 18 हजार 201 मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे या निकालाची चर्चा आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 23, 2024 11:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवरा बायकोच्या लढतीत बायकोची बाजी, जाधवांना पराभवाचा धक्का, दानवेंची लेक जिंकली