advertisement

Maharashtra Assembly Election Results 2024: काँग्रेसची बंडखोरी यशस्वी ठरणार की शिवसेना गड राखणार?

Last Updated:

Maharashtra Assembly Election Results 2024: राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापोली या चार मतदारसंघात शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असे उमेदवार रिंगणात आहेत, तर चिपळूण मतदारसंघात दोन राष्ट्रवादी आमनेसामने आहेत.

News18
News18
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात 38 उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यात तब्बल 22 उमेदवार अपक्ष होते. जिल्ह्यातील रत्नागिगरी, चिपळूण, गुहागर आणि दापोली या चार मतदारसंघात दोन प्रमुख उमेदवारांमध्ये थेट लढत होईल, असे चित्र होते. केवळ राजापूर मतदारसंघात काँग्रेसकडून बंडखोरी झाली असल्याने तेथील लढत तिरंगी झाली.
राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापोली या चार मतदारसंघात शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असे उमेदवार रिंगणात आहेत, तर चिपळूण मतदारसंघात दोन राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. मंत्री उदय सामंत, राजापूरचे उमेदवार किरण सामंत यांनी पाली येथे पहिल्या टप्प्यातच मतदान करुन मतदारसंघाचा दौरा सुरू करुन आढावा घेण्यास सुरुवात केली आह. मंत्री उदय सामंत यांनी प्रथम रत्नागिरी शहरातील अनेक बूथना भेट दिली आणि त्यानंतर ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला.
advertisement
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उदय सामंत यांनी 1,18,484 मते मिळवून विजय मिळवला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (एनसीपी) सुदेश सदानंद मयेकर यांना 31,149 मते प्राप्त झाली होती.
रत्नागिरी (5)दापोलीयोगेश कदम (शिवसेना)संजय कदम (उ.बा.ठा.)संतोष अबगुल
गुहागरराजेश बेंडल (शिवसेना)भास्कर जाधव (उ.बा.ठा.)प्रमोद गांधी
चिपळूणशेखर निकम (राष्ट्रवादी)प्रशांत यादव (पवार राष्ट्रवादी)
रत्नागिरीउदय सामंत (शिवसेना)सुरेंद्रनाथ (बाळ) माने (उ.बा.ठा.)
राजापूरकिरण सामंत (शिवसेना)राजन साळवी (उ.बा.ठा.)
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Assembly Election Results 2024: काँग्रेसची बंडखोरी यशस्वी ठरणार की शिवसेना गड राखणार?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement