Maharashtra Election Results 2024: सिंधुदुर्गात पुन्हा राणेंची जादू चालणार की पारकर वरचढ ठरणार?
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Maharashtra Assembly Election Results 2024: ऐनवेळी उमेदवारी मिळाल्यानंतरही संदेश पारकर यांनी मतदारसंघात प्रभावी प्रचार केला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळेही त्यांच्यासाठी वातावरणनिर्मिती करण्यात मदत झाली.
सिंधुदुर्ग : आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदासंघांचा क्रमवार आढावा घ्यायचा झाल्यास कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार नितेश राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे संदेश पारकर अशी लढत झाली.
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून नारायण राणे यांना मोठी आघाडी मिळाली असल्याने येथून नितेश राणे सहज विजयी होतील, असं मानलं जात होतं मात्र ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांनी नितेश राणे यांना जोरदार टक्कर दिल्याचं दिसलं.
ऐनवेळी उमेदवारी मिळाल्यानंतरही संदेश पारकर यांनी मतदारसंघात प्रभावी प्रचार केला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळेही त्यांच्यासाठी वातावरणनिर्मिती करण्यात मदत झाली.
advertisement
मात्र दुसरीकडे नितेश राणे हे मागच्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात केलेली विकासकामे, मतदारसंघाची बांधणी ही बाब नितेश राणेंसाठी मतदानामध्ये फायदेशीर ठरली. त्यामुळे कणकवलीमध्ये नितेश राणे यांचं पारडं जड दिसलं
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
कुडाळ विधानसभा - रवींद्र हरिश्चंद्र कसालकर (बहुजन समाज पार्टी), विरुद्ध वैभव विजय नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), विरुद्ध निलेश नारायण राणे (शिवसेना), विरुद्ध अनंतराज नंदकिशोर पाटकर (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी),
advertisement
सावंतवाडी विधानसभा - दिपक वसंतराव केसरकर (शिवसेना), विरुद्ध राजन कृष्णा तेली (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), विरुद्ध अर्चना संदीप घारे (अपक्ष), विरुद्ध विशाल प्रभाकर परब (अपक्ष)
कणकवली विधानसभा - चंदक्रात आबाजी जाधव (बहुजन समाज पार्टी), विरुद्ध नितेश नारायण राणे (भाजप), विरुद्ध संदेश भास्कर पारकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2024 7:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Election Results 2024: सिंधुदुर्गात पुन्हा राणेंची जादू चालणार की पारकर वरचढ ठरणार?


