माझ्या बहिणींच्या केसाला जरी धक्का लागला तर हात छाटेल, महाडिकांच्या वक्तव्यावर ठाकरे भडकले
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मोदी मुंबईत आल्यावर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर लोळत जातील आणि म्हणणार आम्हाला मतदान करा. . मोदींना आता कळले की महाराष्ट्रात ठाकरेंची गॅरंटी चालते, असे ठाकरे म्हणाले.
अहमदनगर: लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करू, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे नवा वाद उफाळला असून या वक्तव्याविरोधात उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल करत निषेध व्यक्त केला आहे.माझ्या बहिणींच्या केसाला जरी धक्का लागला तर हात छाटेल, असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान जर आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असतील तर त्यांचीही बॅग तपासली पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. माझी बॅग आता ऑटो चेकिंग मोडवर गेल्याचे दिसते. बॅग दिसली की लगेच तपासली जाते असं बोलताना ठाकरे यांनी पंतप्रधान सोडून इतर सर्वांच्या बॅगा तपासण्याचे आदेश आहेत. मात्र जर पंतप्रधान आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचारासाठी येत असतील तर त्यांचीही बॅग तपासली पाहिजे असं ठाकरे यांनी म्हटलं आहे. श्रीगोंदा येथे महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचार सभेत बोलताना ठाकरे यांनी ही मागणी केली.
advertisement
शेतकरीच काय सर्वांनाच आत्महत्या कराव्या लागतील, उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रामध्ये अमित शहा यांना केंद्रीय सहकार मंत्री केले आहे. मात्र त्या माध्यमातून महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने आजारी पाडायचे आणि कवडीमोल किंमतीत विकत घ्यायचे सुरू झाले आहे. सहकारी बँकांबाबतही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे मोदी-शहांच्या हातात सर्व सूत्र जाणार असतील तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र कोलमडून पडेल. तसेच शेतकरीच काय सर्वांनाच आत्महत्या कराव्या लागतील.
advertisement
महाराष्ट्रात मोदी नाही तर ठाकरे गॅरंटी चालते : उद्धव ठाकरे
महाराष्ट्रातील शेतकरी मारतोय आणि तुम्ही माझ्या महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे पळवताय. मुंबईत मोदींची सभा आहे, त्या सभेच्या बॅनरवर फोटो कुणाचा तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा. मोदी मुंबईत आल्यावर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर लोळत जातील आणि म्हणणार आम्हाला मतदान करा. मोदींना आता कळले आहे की महाराष्ट्रामध्ये तुमची गॅरंटी चालत नाही. महाराष्ट्रात फक्त ठाकरे गॅरंटी चालेल असं ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Nov 14, 2024 5:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माझ्या बहिणींच्या केसाला जरी धक्का लागला तर हात छाटेल, महाडिकांच्या वक्तव्यावर ठाकरे भडकले









