७६ लाख मतदानाचा मुद्दा, प्रकाश आंबेडकर स्वत: युक्तिवादाला उभे राहिले, कोर्टाला म्हणाले...

Last Updated:

VBA Petition Bombay HC: निवडणुकीत शेवटच्या क्षणाला आणि मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतरही मतदानाच्या प्रमाणापेक्षा वाढलेल्या टक्केवारीबद्दल याचिकेतून गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चेतन चंद्रकांत अहिरे यांची ही रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. भारतीय संघ, भारतीय निवडणूक आयोग, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या याचिकेतील प्रतिवादी आहेत.
निवडणुकीत शेवटच्या क्षणाला आणि मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतरही मतदानाच्या प्रमाणापेक्षा वाढलेल्या टक्केवारीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शिवाय, अधिकृत वेळ संपल्यानंतर उपस्थित असलेल्या मतदारांना वाटण्यात आलेले पूर्व-क्रमांकित टोकन उघड न करणे, निवडणूक आयोग त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या विसंगतींबद्दल तपशीलवार डेटा जाहीर करण्यात अपयशी ठरणे आणि त्यांच्याकडे संबंधित डेटा नसल्याची लेखी प्रतिज्ञा देणे गंभीर आहे.
advertisement
या चुकांमुळे ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेची सुरक्षा, अचूकता, विश्वासार्हता आणि पडताळणीबाबत गंभीर शंका निर्माण होत आहेत, असे प्रकाश आंबेडकर न्यायालयात म्हणाले.

संध्याकाळी 6 वाजल्यानंतर अचानक मतदान कसे वाढले ते सांगा

विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदानाच्या प्रकरणावरुन हायकोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर मतदान कसे वाढले ते सांगा, असा सवाल उपस्थित करत दोन आठवड्ंयात उत्तर देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. प्रकाश आंबेडकर यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केली आहे.
advertisement
संध्याकाळी 6 वाजेनंतर निवडणूक विभागाने व्हिडीओग्राफी का केली नाही? नियमांचं पालन का केले नाही? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच आयोगाने सायंकाळी सहा नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ द्यावेत अशीही मागणी आंबेडकरांनी केलीय.

वंचितच्या याचिकेत नेमके काय म्हटले आहे?

याचिकेनुसार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्य आणि निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर किती टोकन वितरित केले होते ते समोर आलेले नाही. विशेषत: सायंकाळी ६ वाजल्यानंतर प्रचंड मतदान झाले, मात्र एकूण मतांच्या टक्केवारीत पारदर्शकता नव्हती, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. निवडणुकीच्या अंतिम काही वेळेत आणि निवडणूक संपल्यानंतर झालेल्या मतदानामुळे गंभीर चिंता निर्माण झाल्याचे याचिकेत म्हटले आहे.
advertisement
मुंबईतील विक्रोळी येथील रहिवासी चेतन अहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत, शेवटच्या क्षणी ७६ लाखांहून अधिक मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे,याशिवाय, जवळपास 288 मतदारसंघांमध्ये 19 जागांवर मिळालेली मते नोंदविलेल्या मतांपेक्षा जास्त होती, तर 76 जागांवर ही संख्या कमी असल्याचेही सांगण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
७६ लाख मतदानाचा मुद्दा, प्रकाश आंबेडकर स्वत: युक्तिवादाला उभे राहिले, कोर्टाला म्हणाले...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement