Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा, निवडणुकीतून माघार, कारण काय?

Last Updated:

Maharashtra Elections Manoj Jarange : आज, सकाळी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील उमेदवारांच्या यादीची घोषणा केली.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
अंतरवाली सराटी :  विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घ्यायचा सोमवारी शेवटचा दिवस आहे, त्याआधी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आज, सकाळी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील उमेदवारांच्या यादीची घोषणा न करता सगळ्यांना धक्का दिला.
जरांगे पाटील यांनी म्हटले, मध्यरात्री उशिरापर्यंत यादी आली नव्हती. आमचे 14 उमेदवार आणि इतर समाजाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. मध्यरात्री 3 वाजेपर्यंत चर्चा झाली नाही. त्यांची यादी न आल्याने एकाच जातीवर निवडणूक जिंकणे सोपं नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. या समाजासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी जरांगे यांनी आपल्या काही जागा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आज उमेदवारांची नावे जाहीर होणार होती. मात्र, मित्रपक्षांनी उमेदवारांची नावे न पाठवल्याने आपण एकाच समाजाच्या मतांवर आणि एकाच समाजाचे प्रतिनिधीत्व म्हणून निवडून जाणे योग्य ठरणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
advertisement

मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटले?

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, आपलं आंदोलन सुरूच आहे, पुन्हा एकदा निवडणूक संपली की आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी म्हटले की, एकाच जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही. रात्री तीन तास चर्चा झाली. एका जातीवर जिंकणं आपण जिंकू शकत नाही. एकट्याने कसं लढायचं असे जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यांनी पुढे म्हटले की, याला आणि पाड म्हणायची इच्छा नाही. लोकांना जे करायचं ते करा, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडणून आणा असे सूचक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले. आम्ही मतदारसंघ ठरवले होते. फक्त उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करणे बाकी होते. निवडणुकीतून माघार घेतली नसून याला तुम्ही गनिमी कावा म्हणू शकता असे जरांगे पाटील यांनी म्हटले. मित्रपक्षांनी यादी का दिली नाही ह्या प्रश्नावर मनोज जरांने यांनी उत्तर देणं टाळलं.
advertisement
जरांगे यांनी कोणत्या मतदारसंघाची केली होती घोषणा? 
बीड लढणार
केज मंठा परतूर फुलंब्री लढणार बाकीचे पाडणार
कन्नड लढवणार
वसमत आणि हिंगोली लढणार
पाथरी लढवणार
हदगाव लढवणार
लोहा आणि कंधार राखीव ठेवलं
धाराशिव
लढवणार भूम परांडा राखीव ठेवला
दौंड आणि पर्वती लढवणार
पाथर्डी शेवगाव लढवणार
करमाळा लढणार माढा राखीव
निफाड नांदगाव लढणार मात्र राखीव
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा, निवडणुकीतून माघार, कारण काय?
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement