Maharashtra Assembly Session : 288 नवनिर्वाचीत आमदारांच्या शपथविधीची क्रमवारी समोर, मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, पवारांचा नंबर कितवा?

Last Updated:

Maharashtra Assembly Special Session : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सूरूवात होतेय. तीन दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. या शपथ घेणाऱ्या आमदारांची आता क्रमवारी समोर आली आहे.

Maharashtra Assembly Session
Maharashtra Assembly Session
Maharashtra Assembly Special Session : विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सूरूवात होतेय. तीन दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. या शपथ घेणाऱ्या आमदारांची आता क्रमवारी समोर आली आहे. यामध्ये कोणत्या आमदाराला पहिला शपथ घेण्याचा मान मिळणार आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी यांचा शपथविधी कोणत्या नंबरवर पार पडणार आहे? हे जाणून घेऊयात.
विधिमंडळ सचिवालयाकडून शपथविधीचा क्रम आता जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार भाजपच्या चैनसुख संचेतींना पहिल्या क्रमांकावर शपथ देण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाचव्या क्रमांकावर शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे सहाव्या तर अजित पवार सातव्या क्रमांकावर शपथ घेणार आहेत.
दरम्यान कालच नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्याकरिता राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. त्यामुळे 7, 8 आणि 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हे हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.
advertisement

विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या 78 नव्या आमदारांचा आज पहिल्यांदा शपविधी होणार आहे. या नवीन चेहऱ्यांमध्ये भाजपचे 33, शिवसेना एकनाथ शिंदे यांचे 14, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8, शिवसेना उद्धव ठाकरे 10, काँग्रेस 6 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 सदस्यांचा समावेश आहे. त्याशिवाय तीन अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Assembly Session : 288 नवनिर्वाचीत आमदारांच्या शपथविधीची क्रमवारी समोर, मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, पवारांचा नंबर कितवा?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement