Maharashtra HSC Result 2024 : बारावीचा निकाल जाहीर, इथे चेक करा निकाल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Maharashtra Board HSC Result 2024 Updates : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी करून निकाल जाहीर केला आहे. बारावीचा निकाल mahresult.nic.in या संकेतस्धळावर दुपारी 1 नंतर आपला निकाल पाहता येईल.
पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Result) झाला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 % इतका लागला आहे. 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाने दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी करून निकाल जाहीर करण्यात आला. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल mahresult.nic.in या संकेत स्थळावर आज दुपारी 1 वाजेनंतर पाहता येईल. यानंतर, विद्यार्थी या अधिकृत वेबसाईट वर जाऊन गुणपत्रिकेची एक प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील.
निकाल कुठे बघायचा? (How to check 12th Result?)
बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन संकेतस्थळावरून निकालाची प्रिंटही काढता येईल. सर्व विषयांचा सविस्तर निकाल संकेतस्थळावर दिसेल.
advertisement
बारावीच्या निकालात मुलींचीच बाजी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढले
बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारलीय. यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला असल्याची माहिती बोर्डाने दिली. दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. याची माहिती बोर्डाकडून देण्यात आलीय. बारावीची परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत झाली. बारावीच्या परीक्षेला राज्यात १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
advertisement
विभागीय निकालात कोकण अव्वल, मुंबईचा सर्वात कमी निकाल
बोर्डाची परीक्षा ९ विभागीय मंडळात झाली. दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 94.20 टक्के इतकी आहे. तर सरासरी टक्केवारी ९१.८७ टक्के इतकी आहे. कोकण विभागाने पुन्हा बाजी मारली असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
राज्यातील 9 विभागात कोकण अव्वल, नाशिक, पुणे, कोल्हापूरचा निकाल 94 टक्के
बोर्डाने जाहीर केलेल्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
advertisement
कोकण 97.51
नाशिक 94.71
पुणे 94.44
कोल्हापुर 94.24
संभाजीनगर 94.08
अमरावती 93.00
लातूर 92.36
नागपूर 92.12
मुंबई 91.95
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक 97.82 टक्के
बारावी परीक्षेत कला शाखेचा निकाल सर्वात कमी लागला असून 85.88 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर विज्ञान शाखेचा निकाल 97.82 टक्के लागला. वाणिज्य शाखेचा निकाल 92.18 टक्के तर व्यवसाय अभ्यासक्रमाचे 87.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयटीआयचा निकाल 87.69 टक्के लागला आहे.
advertisement
राज्यातील 21 संस्था आणि 7 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के
महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत 26 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर राज्यातील 21 संस्थांचा निकाल शून्य टक्के लागल्याची माहिती बोर्डाने दिली. या संस्थांमध्ये बहुतांश संस्था या आयटीआयच्या असल्याचं सांगण्यात येतंय.
बारावी निकाल पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज कसा करायचा? (How to do Rechecking Application for HSC Result?)
ऑनलाइन निकाल मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, पूनर्मुल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज करता येतील. उत्तर पत्रिकेच्या पूनर्मुल्यांकनासाठी आधी उत्तर पत्रिकेची झेरॉक्स कॉपी बोर्डाकडून घ्यावी लागेल. त्यानंतर पाच दिवसात शुल्क भरून अर्ज करावा लागणार आहे.
advertisement
राज्य मंडळाकडून फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये दहावी बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. याचे निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. दरम्यान, बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर केला जाणार असल्याचं समोर आलंय. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 21, 2024 8:02 AM IST