Maharashtra Budget Mumbai : मुंबई महानगर प्रदेशात सुस्साट प्रवास, वाहतूक कोंडी फुटणार, बजेटमध्ये काय मिळाले?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Budget 2025 Mumbai मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाच्या योजनांसाठी आर्थिक बळ देण्यात आले आहे. :
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात महापुरुषांना वंदन करून केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पात मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांना बळ देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाच्या योजनांसाठी आर्थिक बळ देण्यात आले आहे.
>>> वाहतूक कोंडीतून सुटका, सुस्साट प्रवास...
मुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्पांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. त्याचा फायदा पुढील प्रकल्पांना होणार आहे...
> मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट, 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल.
advertisement
> मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64 हजार 783 कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
> ठाणे ते नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन आहे. त्याद्वारे ठाणे, डोंबिवली, कल्याण व अन्य महत्वाची मोठी शहरे आंतरराष्ट्रीय विमानतळाशी सुलभरित्या जोडली जातील.
advertisement
> बाळकुम ते गायमुख या ठाणे किनारी मार्गाची लांबी 13.45 किलोमीटर असून त्याचे सुमारे 3 हजार 364 कोटी रुपये खर्चाचे काम सन 2028 अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
> स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूचे वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे 14 किलोमीटर लांबीचे, 18 हजार 120 कोटी रुपये खर्चाचे काम मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
advertisement
> उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 10, 2025 2:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Budget Mumbai : मुंबई महानगर प्रदेशात सुस्साट प्रवास, वाहतूक कोंडी फुटणार, बजेटमध्ये काय मिळाले?


