Maharashtra Budget Ajit Pawar: ''आज माझं मन जड झालंय...आजचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित'', CM फडणवीसांकडून स्मारकाची घोषणा
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Budget 2026: दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांचा आठवणींना उजाळा देत दोन मोठ्या घोषणा केल्या.
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांचा आठवणींना उजाळा देत दोन मोठ्या घोषणा केल्या.
मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे फडणवीस यांनी अर्थ खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हटले की, आज माझं जड झालंय आहे. आजचा अर्थसंकल्प आपण अजितदादांना समर्पित करत असल्याचे त्यांनी म्हटले.
अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या प्रशासनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अजित पवार व अर्थसंकल्प हे नाते दृढ झाले होते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळेच महाराष्ट्राची वित्तीय स्थिती कठीण काळात स्थिर राहिली. काम करणारा माणूस ही त्यांची ओळख होती. त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल. तसेच त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल असे मी जाहीर करतो, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 2:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Budget Ajit Pawar: ''आज माझं मन जड झालंय...आजचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित'', CM फडणवीसांकडून स्मारकाची घोषणा










